Home शहर निविदा भरून अटी शर्ती न पाळता वेळेवर काम न करणे ,अर्धवट काम...

निविदा भरून अटी शर्ती न पाळता वेळेवर काम न करणे ,अर्धवट काम करणे,आशा अनेक नगरसेवकांच्या तक्रारी मुळे “त्या” ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे पत्र महापौर,स्थायी समिती अध्यक्ष यांनी मनपा आयुक्तांना दिल्याने माझ्यावर टक्केवारीचा आरोप – नगरसेवक अविनाश घुले

अहमदनगर दि.२ जून
अहमदनगर महानगरपालिकेचे समितीचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक अविनाश घुले यांनी आपल्याकडून टक्केवारी मागितल्याचा आरोप महानगर पालिकेतील एका ठेकेदाराने मनपा आयुक्तांना लेखी निवेदन देऊन केला होता.

यावर नगरसेवक अविनाश घुले यांनी प्रतिक्रिया दिली असून प्रभागातील कामे दर्जेदार व्हावे याकरता आपण प्रयत्नशील असून आणि कामे दर्जेदार करण्यासाठी आपण महानगरपालिका यंत्रणेमार्फत जो ठेकेदार राहील त्यांना वारंवार ज्या गोष्टी सांगत असतो मात्र ज्या ठेकेदाराने माझ्यावर आरोप केले आहेत. त्या ठेकेदाराच्या विरोधात महानगरपालिकेतील अनेक नगरसेवकांनी लेखी तक्रार केल्या आहेत. त्या रागातून आपल्यावर खोटे आरोप होत असल्याचा खुलासा नगरसेवक अविनाश घुले यांनी केला आहे.

शहानजवान रफीक शेख यांची एस. एफ. शेख कंन्स्ट्रक्शन, अहमदनगर ही ठेकेदार संस्था महानगरपालिकेत वेगवेगळ्या निविदा भरून विविध विकास कामे करित असतात परंतु संबंधीत संस्था महानगरपालिकेची विकास कामे घेतात.

सदरील कामे कार्यारंभ आदेश दिल्यानंतर अटी व शर्तीप्रमाणे काम सुरू न करणे, विहित वेळेत काम पूर्ण न करणे सुरू केलेली कामे अर्धवट अवस्थेत ठेवून अनेक दिवस बंद ठेवतात. या कारणांमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे नागरिकांचा प्रशासन व नगरसेवकांबद्दल रोष निर्माण होत आहे.

तरी सदरील दोन्ही ठेकेदार संस्थेची महानगरपालिकेची नोंदणी रद्द करून या संस्थेस महानगरपालिकेचे कामे घेण्यास प्रतिबंधीत करण्यात येवून त्यांना काळया यादीत टाकण्यात यावे तसेच सध्या या संस्थेचे महानगरपालिकेकडे चालू असलेल्या कामाची सखोल चौकशी करून चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांची देयके अदा करू नयेत तसेच सध्या सुरू असलेल्या निविदे प्रक्रियेत त्यांनी भरलेल्या निविदा स्विकारू नयेत व त्या रद्द करण्यात याव्यात. असे पत्र महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांना अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर रोहीणी शेंडगे तसेच स्थायी समितीचे विद्यमान सभापती कुमार वाकळे यांच्यासह महानगरपालिकेतील नगरसेवकांनी आपल्या सहीनिशी निवेदन दिले आहे. याचा राग मनात धरून ठेकेदार आपल्यावर चुकीचे आरोप करत असल्याचे अविनाश घुले यांनी सांगितले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version