अहमदनगर दि.२६ डिसेंबर
सोलापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय आंतरजिल्हा बॅडमिंटन टूर्नामेंट मध्ये अहमदनगर जिल्ह्याचा झेंडा नगरच्या अनन्या हेमंत सोले हिने फडकवला आहे.
सोलापूर येथे नुकत्याच योनेक्स सनराईझ महाराष्ट्र राज्य खुल्या आंतर जिल्हा बॅडमिंटन स्पर्धा पार पडल्या. सोलापूर बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने 22 डिसेंबर ते 25 डिसेंबर दरम्यान या टूर्नामेंट घेण्यात आल्या होत्या.या स्पर्धेत अहमदनगर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनची खेळाडू व ऑक्सिलीम स्कूलची विद्यार्थिनी कु.अनन्या सोले हिने मुलींच्या 15 वर्ष वयोगट अंतर्गत चुरशीच्या अंतिम सामन्यात अगदी थोड्या गुणांमुळे रनर अप (दुसरे स्थान ) पटकावले आहे.
कु.अनन्या हिला मल्हार कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले असून अहमदनगर शहरातील गुलमोहर रोड परिसरात राहणारे प्रसिद्ध डॉक्टर हेमंत सोले डॉक्टर मीनल सोले यांचे प्रोत्साहन आणि ओक्सोलियम स्कूलमधील सर्वच शिक्षकांचे सहकार्य आणि अहमदनगर बॅडमिंटन असोसिएशनचे सर्वच पदाधिकाऱ्यांचे खेळाडूंचे मार्गदर्शन यामुळे तिला यश मिळाले आहे तिचा या यशाबद्दल अनन्या शोले हिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.