अहमदनगर दि.२५ डिसेंबर
अहमदनगर शहरातील सावेडी उपनगर मध्ये राहणाऱ्या एका तरुण वकीलावर खुनी हल्ला झाला असून या तरुण वकिलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र हा हल्ला कोणी केला या बाबत अद्याप माहिती मिळाली नसून पोलीस याबाबत तपास करत आहेत.
अहमदनगर शहरात गेल्या सहा महिन्यांपासून खून आणि खून करण्याचा प्रयत्न करण्याचा घटना वारंवार घडत असून पोलिसांचा धाक कमी झालाय का असा सवाल उपस्थित होतोय.