अहमदनगर दिनांक 14 डिसेंबर
अहमदनगर शहरात आज सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मोर्चा सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून निघणार असून शहरातील विविध मार्गांवरून दिल्लीगेट येथे या मोर्चाची समाप्ती होणार आहे.
या मोर्चाचे आयोजन समस्त सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले असून यामध्ये विविध हिंदू संघटनांचा सहभाग आहे आज सकाळच्या दरम्यान कोतवाली पोलिसांनी बजरंग दलाचे शहराध्यक्ष कुणाल भंडारी आणि युवा मोर्चाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष बंटी डापसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कलम 69 प्रमाणे मोर्चा संपेपर्यंत या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात ठेवले आहे.मोर्चाचा अगोदरच हिंदू संघटनेचा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.