Home राजकारण उड्डाणपुलाचा श्रेयवाद आता बाळासाहेबांची शिवसेना गटाकडून खासदार सुजय विखे पाटील टीकेचे लक्ष

उड्डाणपुलाचा श्रेयवाद आता बाळासाहेबांची शिवसेना गटाकडून खासदार सुजय विखे पाटील टीकेचे लक्ष

अहमदनगर दि.१ नोव्हेंबर

अहमदनगरच्या उड्डाणपुलावरून आता चांगलेच राजकारण पेटले आहे सोमवारी या पूलाची पाहणी खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी केल्यानंतर उद्धव ठाकरे गट शिवसेने च्या फेसबुक पेजवरून खा. सुजय विखे पाटील यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता एकनाथ शिंदे शिवसेना गटही मैदानात उतरला असून त्यांनीही खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर टीका केली असून खासदार सुजय विखे पाटील हे स्व.माजी आमदार अनिल राठोड यांच्या मदतीमुळे खासदार झाले असल्याने आणि स्वर्गीय माजी आमदार अनिल राठोड यांनी उड्डाणपुलासाठी आंदोलने आणि पाठपुरावा केला होता तरीही विद्यमान खासदार सुजय विखे पाटील हे स्व.माजी आमदार अनिल भैय्या राठोड यांचे नावही घेत नाही अशी टीका या फेसबुक पेजवरून करण्यात आली. त्यामुळे दोन्ही शिवसेनेच्या गटाकडून खासदार सुजय विखे पाटील हे टीकेचे लक्ष झाले आहेत.

खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप हे काही काळापासून नगर शहरात एकत्रितपणे विविध कार्यक्रमांना हजेरी लावत असल्यामुळे अधून मधून शिवसेनेच्या फेसबुक पेजवरून दोघांनाही टीकेचे लक्ष करण्यात आले होते मात्र आता उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट या दोघांनीही खासदार सुजय विखे पाटील यांना टीकेचे लक्ष केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version