अहमदनगर दिनांक ८ एप्रिल
अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयात आज बँक घोटाळा प्रकरणी आणि पतसंस्था घोटाळा प्रकरणी मोठमोठे निकाल हाती येण्याची शक्यता आहे. संपदा पतसंस्थेच्या संचालकांना न्यायालयाने घोटाळ्याप्रकरणी दोषी धरले आहे. आज या प्रकरणी कोणती शिक्षा लागते याकडेच सर्व ठेवीदारांचे आणि सभासदांचे लक्ष लागून आहे.
तर अर्बन बँक कर्ज घोटाळा प्रकरणी सुरू असलेला तपास आणि अटक झालेले आरोपी तसेच ज्या आरोपींनी अटकपूर्वक जमिनीसाठी न्यायालयात धाव घेतली आहे त्यांच्या जामीनावरही आज न्यायालयात सुनावणी होणार आहे.
माजी खासदार स्वर्गीय दिलीप गांधी यांचे सुपुत्र देवेंद्र दिलीप गांधी, प्रगति देवेंद्र गांधी,कमलेश हस्तीमल गांधी ,राजेंद्र केशवराव डोळे यांच्या अटकपुर्व जामीन अर्जावर युक्तिवाद असून सध्या अटकेत असलेले राजेंद्र शांतीलाल लुणिया,अमित वल्लभराय पंडीत,
अविनाश प्रभाकर वैकर,प्रविण सुरेश लहारे, प्रदिप जगन्नाथ पाटील त्यांच्याही नियमित जमिनीवर सुनावणी होणार आहे त्यामुळे आज संपदा आणि अर्बन बँकेच्या घोटाळेबाजांच्या बाबत होणाऱ्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.