Homeक्राईमभिस्तबाग चौकात चहाच्या टपरीवर गांजाची विक्री एकजण ताब्यात तोफखाना पोलिसांची कारवाई ..

भिस्तबाग चौकात चहाच्या टपरीवर गांजाची विक्री एकजण ताब्यात तोफखाना पोलिसांची कारवाई ..

advertisement

अहमदनगर दिनांक 7 एप्रिल

सावळी परिसरातील भिस्त व परिसरातील वधू वाडी येथील एका चहाच्या टपरीवर गांजाचे विक्री करत असलेल्या इसमास तोफखाना पोलिसांनी पकडले असून त्याच्या जवळून जवळपास दोन किलो 450 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. बाजारात त्याची किंमत जवळपास 40 हजार रुपयांच्या वर असून चहाच्या टपरीवर हा गांजा विक्रीचा व्यवसाय सुरू होता.


तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली असून त्यांना मिळालेल्या माहितीनुसार वैदुवाडी परिसरातील भुलेश्वर टी सेंटर या चहाच्या टपरीवर मच्छिंद्र सिताराम शिंदे हा लपून छपून गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी
शैलेश पाटील तसेच अंमलदार, दोन पंच, नयाब तहसीलदार व पंचानामाकामी लागणा-या सर्व साहित्यासह भुलेश्वर टी सेंटर येथे छापा टाकून त्या ठिकाणावरून चाळीस हजार रुपये किमतीचा दोन किलो 460 ग्रॅम गांजा पकडला आहे.

तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी शिरिष बाळासाहेब तरटे यांच्या फिर्यादीवरुन शिंदे याच्या विरुध्द गुन्हा NDPS कायदा कलम ८ (क), २० ( ब ) ii (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक अहमदनगर श्री. राकेश ओला, मा. अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, अहमदनगर, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, नगर शहर विभाग यांच्या सुचना मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, श्री. आनंद कोकरे, तोफखाना पो.स्टे अहमदनगर यांचे पथकातील पो.उप.नि श्री. शैलेश पाटील, पोहेकॉ दत्तात्रय जपे,
सुनिल शिरसाठ, अहमद इनामदार, भानुदास खेडकर, दिनेश मोरे, सुधीर खाडे, पो.ना वसिम पठाण, संदिप धामणे, सुरज वाबळे, पो.कॉ सतिष त्रिभुवन, शिरीष तरटे, सुमित गवळी, दत्तात्रय कोतकर, सतिष भवर, बाळासाहेब भापसे यांनी केली आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular