अहिल्यानगर दिनांक 21 मे
प्रभाग क्रमांक नऊ मधील सिद्धार्थ नगर भागात अनेक दिवसांपासुन कचरा साचलेला आहे. सिद्धार्थ नगर भाग हा मोठ्या लोकवस्ती चा आणि पालिकेचे अनेक कर्मचारी याच प्रभागात राहतात. त्यांचे व त्यांच्या मुलांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.ज्या ठिकाणी हा कचरा साचलेला आहे त्याच्या बाजूला करंदिकर हाॅस्पिटल आणि महानगर पालिकेचे आरोग्य केंद्र आहे. अनेक रुग्ण या हाॅस्पिटल मध्ये आणि आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी येतात.त्या ठिकाणी कचरा साचल्यामुळे खुप मोठ्या प्रमाणात दूर्गंधी पसरलेली आहे.व अनेक लोक आजारी पडत आहे.
तरी संबंधित विभागाला सिद्धार्थ नगर भागातील कचरा त्वरित उचलण्याचे आदेश द्यावे हि विनंती. अन्यथा सर्व नागरीकां समवेत तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी दिला आहे.