अहिल्यानगर दिनांक 22 मे
शहरातील सर्व अनधिकृत काढण्याचे आदेश प्रशासक तथा आयुक्तांनी दिले आहेत. मात्र, हे आदेश धाब्यावर बसवत शहरात अनेक ठिकाणी मोठमोठ्या जाहिराती झळकत आहेत. शहरासह उपनगरांमध्ये टोलेजंग होर्डिंग्ज, फ्लेक्स आणि किऑक्सचा सुळसुळाट झाला आहे. यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर सुटणाऱ्या वादळी वाऱ्यात अशा अनाधिकृत होर्डिंग मुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याला कोण जबाबदार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अवकाळी पाऊस आणि वादळाच्या तडाख्यात अनेक ठिकाणी होर्डिंग्ज कोसळून निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत अशी मोठी घटनाही घडलेली आहे.या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे शहरातील सर्व होर्डिंग बॅनर काढण्याचे आदेश दिले होते मात्र हे अनाधिकृत अधिकृत बॅनर शहरात जळकत असून यामुळे मोठी घटना होण्याची शक्यता आहे सध्या अवकाळी वादळ वारे आणि पाऊस जोरात सुरू असून यामुळे नगर शहरातील सावेडी उपनगरांमधील तारापूर भागात अशाच एका फ्लेक्स बोर्डमुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती मात्र माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी त्या ठिकाणी जाऊन तो बोर्ड काढून पुढील अनर्थ टाळला भला मोठा बॅनर विद्युत खांबाला चिटकून लावल्यामुळे मोठा अनर्थ घडू शकला असता मात्र हे बॅनर जरी नगरसेवकांच्या तत्परतेमुळे निघाले असले तरी शहरातील आणि उपनगरातील इतर बॅनर कडे कोण लक्ष देणार असा सवाल माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून विजेचा खेळ खंडोबा होत आहे याचे मुख्य कारण अनेक बॅनर फाटून विजेच्या तारांवर पडल्यामुळे विद्युत खंडित झाल्याचं महावितरण अधिकाऱ्यांनी सांगितले आहे त्यामुळे अशा अनाधिकृत बॅनर काढण्याची तसदी महानगरपालिका घेणार का असा सावलही आता नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी उपस्थित केला आहे.
पावसाळ्याच्या तोंडावर वादळी वारे आणि अवकाळी पावसाची शक्यता असल्याने शहरातील सर्व होर्डिंग रिकामे ठेऊन एखादी मोठी दुर्घटना होण्याआधी टाळता कशी येईल या कडे अहिल्यानगर महानगरपालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे असेही मत माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी व्यक्त केले आहे.