Home Uncategorized हॉटेल चालवायचे असेल तर महिन्याला हफ्ता दे म्हणत तरुणाला मारहाण, पाच जणांविरुद्ध...

हॉटेल चालवायचे असेल तर महिन्याला हफ्ता दे म्हणत तरुणाला मारहाण, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर दि. २७ मे
अहमदनगर शहरातील बालिकाश्रम रोड वर सर्वस्व भोजनालय या नावाने छोटेसे हॉटेल चालवत असलेल्या ओमकार टाक या तरुणाला हप्ता मागणी करून ऐका टोळक्याने जबर मारहाण केली आहे.या भागात भोजनालय चालवायचे असेल तर दर महिन्याला ठराविक हप्त्याची रक्कम द्यावी लागेल ती देण्यास नकार दिल्याने ओमकार टाक यास ऋषिकेश दरंदले ,रजनीश वाघ, टिंग्या साळवे व इतर दोन अनोळखी तरुणांनी बेदम मारहाण केली तसेच ओमकार टाक या च्या गळ्यातील 90 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन या टोळक्याने चोरून नेली आहे .

ओंकार टाक यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये भावड्या उर्फ ऋषिकेश दरंदले, टिंग्या साळवे ,रजनिश वाघ आणि इतर दोन अनोळखी लोकांविरुद्ध खंडणी, दरोडा मारहाण करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास तोफखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे करीत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version