अहमदनगर दि.१५ डिसेंबर
अहमदनगर शहरात निघालेल्या जन आक्रोश मोर्चा दरम्यान शिवसेनेचा ज्येष्ठ महिला पदाधिकारी स्मिता अष्टेकर यांनी विविध वृत्त वाहिन्यांना मुलाखत देऊन आपले मत व्यक्त केले होते.मात्र यानंतर विविध वृत्तवाहिन्यांवर आलेल्या व्हिडिओ क्लिप चा वापर करून स्मिता अष्टेकर यांच्या फोटो खाली अश्लील शेरेबाजी करत त्या व्हाट्सअप स्टेटसला ठेवून लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारे सोशल मीडियावर फिरवण्यात आले होते.
याप्रकरणी आज भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्मिता अष्टेकर यांनी गुन्हा नोंदवला असून स्मिता अष्टेकर यांच्या फिर्यादीनुसार सरदार मंडप आसिफ सय्यद याच्या विरोधात भादवि कलम 509,505 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत हकीगत अशी की स्मिता अष्टेकर यांच्या फोटो खाली अश्लील शब्दप्रयोग करुन लज्जा उत्पन्न होईल आणि विनयभंग करण्याचे उद्देशाने शब्दप्रयोग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा तपास भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनी एस के देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई साळुंखे करत आहेत.