Home शहर शहरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य पूर्ण कृती पुतळा उभारणार –...

शहरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य पूर्ण कृती पुतळा उभारणार – आ. संग्राम जगताप

अहमदनगर दि.१३ नोव्हेंबर-
नगर शहरामधील मार्केटयार्ड चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा बसविण्यास संदर्भात मनपाने प्रक्रिया सुरू केली असून आज आ.संग्राम जगताप व मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली यावेळी , ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड, सुरेश बनसोडे, नगरसेवक राहुल कांबळे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, नगरसेवक प्रशांत गायकवाड, मा.नगरसेवक सुनील कोतकर, अजय साळवे, सुमेध गायकवाड, शहर अभियंता सुरेश इथापे, किरण दाभाडे, रोहित आव्हाड, अतिक्रमण विभाग प्रमुख रोहिदास सातपुते, , दीपक लोंढे, महेंद्र कांबळे, सतीश शिरसाठ, शामवेल ब्राऊन, सिद्धार्थ आढाव, इंजि. श्रीकांत निंबाळकर आदी उपस्थित होते.
आ.संग्राम जगताप यांनी झालेल्या बैठकीत सांगितले की, सर्वांनी एकत्रित येऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा उभारण्या संदर्भात कमिटी स्थापन करून सर्व अधिकार घेण्याचे निर्णय कमिटीला द्यावे, या संदर्भात असलेले पत्र मनपा आयुक्त यांच्याकडे सुपूर्त करावेत कमिटीने घेतलेले निर्णय अंतिम राहील जेणेकरून पुतळा उभारण्याच्या कामास गती प्राप्त होईल. तातडीने पुतूळा उभारण्यासाठी चार आर्किटेक, इंजिनीयर यांची नेमणूक करून त्यांच्याकडून नवीन संकल्पना असलेला आराखडा तयार करून घ्यावा व या परिसरातील सुशोभीकरणाचे नियोजन करावे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजाला नेहमीच प्रेरणा देणारे आहेत.
यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड म्हणाले की, मार्केटयार्ड चौकात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतूळ्या शेजारी उड्डाणपूल असून त्याचा विचार करून भव्य दिव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा तसेच उड्डाण पुलाच्या पिलरवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र रेखाटावे
सुरेश बनसोडे म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सध्याचा पुतळा हा सामाजिक न्याय भावनांच्या आवारात बसविण्यात यावा या पुतळ्याला एक ऐतिहासिक महत्त्व प्राप्त आहे. समाज बांधवांना एकत्रित घेऊन कमिटी स्थापन करू व पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामास गती देऊ.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version