अहिल्यानगर प्रतिनिधी :
भिंगार येथील स्थानिक पत्रकारांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत ‘भिंगार प्रेस क्लब’ची एकमताने स्थापन करण्यात आली. या बैठकीत अध्यक्ष बाबासाहेब ढाकणे, उपाध्यक्ष स्वप्निल झोडगे, सचिव प्रसाद शिंदे, सहसचिव अमोल भिंगारदिवे, खजिनदार वैष्णवी कदम आदींची एकमताने नवनियुक्त पदाधिकार्यांची निवड करण्यात आली.

अध्यक्षपदासाठी उमेर सय्यद यांनी बाबासाहेब ढाकणे यांच्या नाव सुचविले. त्यास अनिकेत यादव यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी मोहसीन कुरेशी यांनी स्वप्निल झोडगे यांचे नाव सूचविले, त्यास गिरीश रासकर यांनी अनुमोदन दिले. सचिवपदासाठी प्रशांत पाटोळे यांनी प्रसाद शिंदे यांचे नाव सुचविले,त्यास स्वप्निल झोडगे यांनी अनुमोदन दिले. सहसचिवपदासाठी बाबासाहेब ढाकणे यांनी अमोल भिंगारदिवे यांच्या नाव सुचविले, त्यास अनिकेत यादव यांनी अनुमोदन दिले, तर खजिनदारपदासाठी स्वप्निल झोडगे यांनी वैष्णवी कदम यांचे नाव सूचविले, त्यास गिरीश रासकर यांनी अनुमोदन दिले.
यावेळी बैठकीत भिंगार प्रेस क्लब नवनियुक्त पदाधिकार्यांचा व उपस्थितीत कार्यकारिणी सदस्यांचा शाल, पुष्प देऊन गौरव करण्यात आला.



