Home जिल्हा माजी मंत्री आमदार प्राजक्ता पुरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारला जागा आणण्यासाठी सायकल रॅली…...

माजी मंत्री आमदार प्राजक्ता पुरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारला जागा आणण्यासाठी सायकल रॅली… आम्हाला बुलेट ट्रेन नको ग्रामीण भागात रस्ते द्या

राहुरी दि.१८ ऑक्टोबर

ग्रामीण भागातील समस्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारने समजून घ्याव्यात ग्रामीण भागातील लोकांना 600 कोटी रुपये खर्च करून चालणारी बुलेट ट्रेन नको तर ग्रामीण भागातील लोकांना गावातील रस्ते तसेच शेतातील वाड्यावस्तीवर जाण्यासाठी रस्ते हवे आहेत. शिंदे फडवणीस सरकारने ग्रामीण भागातील रस्त्यांना स्थगिती देऊन बुलेट ट्रेन सारख्या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.

मात्र ग्रामीण भागातील लोकांना शेतकऱ्यांना दुचाकी वर गावातल्या दूध डेरी पर्यंत जायला तसेच गावातील पेशंट शहरी भागात नेण्यासाठी रस्त्याअभावी अडचणी होतात. महाविकास आघाडी सरकारने ही लोकभावना लक्षात घेऊन मंजूर केलेल्या सुमारे 7 कोटी रुपयांच्या ग्रामविकास विभागाच्या निधीला या शासनाने स्थगिती दिली आहे.

याचा निषेध म्हणून माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी,नांदूर, मल्हारवाडी, घोरपडवाडी अशी सायकल रॅली २० ऑक्टोबर रोजी निघणार आहे. 21 तारखेला राहुरी बाभुळगाव खडांबे तमनर आखाडा अशी रॅली असणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी राहुरी तालुक्यातील नागरिकांनी मोठया संख्येने या रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन माझे मंत्री आं.प्राजक तनपुरे यांनी केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version