HomeUncategorizedसर्जेपुरातील रंगभवन व्यापारी संकुलात तीन मजले फक्त पार्किंगसाठी राखीव ठेवणार शहराच्या...

सर्जेपुरातील रंगभवन व्यापारी संकुलात तीन मजले फक्त पार्किंगसाठी राखीव ठेवणार शहराच्या बाजारपेठेतील पार्किंग समस्या सोडवण्यासाठी महापालिकेच्या उपाययोजना ४८ व्यावसायिक गाळे, सांस्कृतिक सभागृहाचा समावेश : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून होणार हे नवीन संकुल

advertisement

अहिल्यानगर – दिनांक १२ मे

सर्जेपुरा येथील महानगरपालिकेचे रंगभवन व्यापारी संकुल पाडून त्याजागी व्यापारी संकुल, सांस्कृतिक सभागृह व पार्किंग व्यवस्था असलेले बहुमजली संकुल उभारण्यात येणार आहे. मध्य शहर व बाजारपेठेतील पार्किंग समस्या मार्गी लावण्यासाठी या संकुलात व्यवस्था करण्यात आली आहे. संकुलातील तीन मजल्यावर ४१० दुचाकी व १०० चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य शहरातील व बाजारपेठेतील पार्किंगची समस्या दूर होण्यास मदत होणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.

सध्याच्या रंगभवन व्यापारी संकुलात तळ मजल्यावर १८ गाळे आहेत. आता आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून महानगरपालिकेने स्वतःच हे व्यापारी संकुल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. संकुलात ४८ व्यावसायिक गाळे, सांस्कृतिक सभागृह व पार्किंग असणार आहे. शहरातील बाजारपेठेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर व बाजारपेठेजवळच हे संकुल असल्याने बाजारपेठेतील पार्किंगचा प्रश्न या संकुलामुळे मार्गी लागणार आहे.

प्रस्तावित नवीन रंगभवन व्यापारी संकुलात तळघर – पार्किंग, तळमजला – पार्किंग व २४ गाळे, पहिला मजला – पार्किंग व २६ गाळे, दुसरा मजला – पार्किंग, तिसरा मजला – पार्किंग, चौथा मजला – सांस्कृतिक सभागृह अशी व्यवस्था असणार आहे. नव्याने संकुल उभारणीसाठी तयार करण्यात आलेला आराखडा नगररचना विभागाकडे तपासणीसाठी पाठवून त्याचा आराखडा मंजूर करून घेतला आहे. अंदाजपत्रक तयार करण्यात येत आहे. संकुलाच्या उभारणीसाठी सुमारे ३५ कोटींचा खर्च अपेक्षित असून, राज्य व केंद्र शासनाच्या अर्बन चॅलेंज योजनेतून निधी मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.

बाजारपेठ व मध्य शहरात दिवसेंदिवस पार्किंगची समस्या वाढत आहे. त्यामुळे व्यापारी संकुलांमध्ये पार्किंगसाठी अधिकाधिक जागा पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. सर्जेपुरातील रंगभवन व्यापारी संकुलात तीन मजले केवळ पार्किंगसाठी राखून ठेवण्यात आले आहेत. बहुमजली पार्किंग असणारे शहरातील व महानगरपालिकेचे हे पहिलेच व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे. यामुळे मध्य शहरातील बाजारपेठेतील पार्किंगची समस्या सुटण्यास मदत होईल, असा विश्वास आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी व्यक्त केला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular