Homeक्राईमस्विफ्ट आणि इंडिगो कार मधून गोवंशीय जनावरांची कत्तल करून वाहतूक करणाऱ्या दोन...

स्विफ्ट आणि इंडिगो कार मधून गोवंशीय जनावरांची कत्तल करून वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना ठोकल्या बेड्या तर कत्तलीसाठी डांबुन ठेवलेल्या 21 गोवंशीय जनावरांची सुटका स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

advertisement

नगर दिनांक 12 मे
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील ममदापूर या ठिकाणी शोएब कुरेशी आणि त्याचे साथीदार गोवंशीय जनावरे डांबून ठेवून या जनावरांची स्विफ्ट व इंडोगो कारमधून वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक नेमून ममदापूर येथे छापा टाकला असता त्या ठिकाण एका घरासमोर इंडीगो व स्वीफ्ट कार उभा असल्याची दिसल्या . पोलिसांनी छापा टाकल्यानंतर स्विफ्ट कार मधील एक इसम त्या ठिकाणावरून पळून गेला.तर इंडीगो कारमधील साजीद युनूस कुरेशी, रेहान अहमद अयाज कुरेशी, या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले तर शोएब यासिन कुरेशी,मुद्दसर गुलाम कुरेशी हे दोघे फरार झाले.

त्या ठिकाणी असलेल्या वाहनाची तपासणी पोलिसांनी केली असता इंडीगो आणि स्वीफ्ट गाडीमध्ये तोंड प्लास्टीक चिकट टेपने बांधलेले गोवंश जातीचे वासरे असल्याचे दिसून आले.तसेच घटनाठिकाणी एका अर्धवट काम झालेल्या घरामध्ये गोवंश जातीची जिवंत वासरे विना चारा पाण्याचे चिकट टेपने तोंड बांधुन ठेवलेली मिळून आली.

स्थानिक गुन्हे शाखेने जवळपास नऊ लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल ममदापूर या ठिकाणावरून जप्त केला असून त्यामध्ये 21 गोवंशीय जातीचे वासरे एक इंडिगो कार आणि एक स्विफ्ट कार त्या ठिकाणी मिळून आली. आरोपीविरूध्द लोणी पोलीस स्टेशन मध्ये महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा कलम 5 (अ), 5 (ब), 9 सह प्राण्यांना निदर्यतेने वागविण्याचे कलम 3, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर , पीएसआय अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, गणेश भिंगारदे, गणेश लोंढे, सोमनाथ झांबरे, बाळासाहेब नागरगोजे, अमोल कोतकर, मनोज लातुरकर, बाळसाहेब गुंजाळ, भगवान थोरात, सुनिल मालणकर, भाऊसाहेब काळे, अमृत आढाव, विशाल तनपुरे, प्रमोद जाधव, रणजीत जाधव, रमीजराजा आत्तार, शिवाजी ढाकणे व उमाकांत गावडे. यांनी केली.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular