Home शहर वाढदिवस निमित्ताने सामाजिक बांधीलकी… विठ्ठल भाऊसाहेब वाडगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनाम प्रेम...

वाढदिवस निमित्ताने सामाजिक बांधीलकी… विठ्ठल भाऊसाहेब वाडगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनाम प्रेम मध्ये मिष्टान्न भोजन…

अहिल्यानगर दि. आठ डिसेंबर

अहिल्यानगर मधील वृध्देश्वर अर्बन मल्टीस्टेट
को-ऑप. क्रेडीट सोसायटीचे संस्थापक चेअरमन
विठ्ठल भाऊसाहेब वाडगे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनाम प्रेम संस्थेमधील मुलांना चैतन्य स्टोन क्रेशर चे संचालक योगेश देशमुख आणि सनी पॅलेस हॉटेलचे संचालक बाबूशेठ चिपाडे,श्रीकांत जयसिंग जवक यांनी अनाम प्रेम मधील मुलांबरोबर वाढदिवस साजरा करून त्यांच्या हस्तेच केक कापून अनाम प्रेम मधील मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले.

विठ्ठल भाऊसाहेब वाडगे पाटील सामाजिक कार्याची वाटचाल वृध्देश्वर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटीच्या माध्यमातून सुरू आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांच्या मित्रपरिवाराने अनामप्रेम संस्थेतील मुलांबरोबर वाढदिवस साजरा केला.

नगर शहरातील येथील “अनाम प्रेम “या दिव्यांग मुलांचा सांभाळ करणाऱ्या संस्थेस भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांबरोबर वेळ घालवून त्यांच्या समस्या जाणून त्यावर एक मदत रुपी फुंकर घालण्याचा प्रयत्न केला सर्व विद्यार्थ्यांसोबत मिष्टान्न भोजन केले. अनामप्रेम मध्ये राहत असलेल्या लहान मुलं मुलींनी देखील तेवढ्याच पद्धतीने विठ्ठल वाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आलेल्या त्यांच्या मित्र परिवाराचे स्वागत केलं आणि आपापल्या विविध कला गुणांची एक चुनुक दाखवली मुलांबरोबर गप्पागोष्टी करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा एक छोटासा प्रयत्न विठ्ठल भाऊसाहेब वाडगे पाटील यांच्या मित्र परिवाराने केला.

आम्हाला वेगळ समजू नका. आम्हाला पैशांच्या मदतीची गरज नसून तुमच्या 2 शब्दांची, मैत्रीची गरज आहे. अशी भावनाही यावेळी येथे असलेल्या अंध बांधवांनी व्यक्त केली. विठ्ठल वाडगे यांच्या मित्रपरिवाराने वाढदिवस साजरा करून आपल्या जीवनातील एक दिवस आमच्याबरोबर घालवला याबद्दलही सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे धन्यवाद मानले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version