HomeUncategorizedभाजपच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रिया शिरीष जानवे आणि पदवीधर प्रकोष्ठपदी दामोदर बाठेजा...

भाजपच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रिया शिरीष जानवे आणि पदवीधर प्रकोष्ठपदी दामोदर बाठेजा यांची निवड जाहीर…

advertisement

अहमदनगर दि. १८ ऑक्टोबर
अहमदनगर भाजपच्या वतीने नूतन शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी नवीन कार्यकारिणीची घोषणा केली असून अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून कार्यकारणी बाबत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनमध्ये उत्कंठा होती. नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांचा मेळ घालत शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी ही कार्यकारणी जाहीर केली आहे. आगामी लोकसभा विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर शहरातील अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना या कार्यकारणीत स्थान मिळाले आहे.

गुलमोहर रोड परिसरातील नरहरी नगरमध्ये राहणारे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे शिरीष जानवे यांच्या पत्नी प्रिया जानवे यांना महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी संधी मिळाली आहे. अनेक दिवसांपासून प्रिया जानवे या भाजपच्या कार्यकर्त्या असून तळागाळातील लोकांपर्यंत भाजप पोहोचवण्याचं काम सुप्रिया जानवे यांनी केले आहे. सावेडी उपनगरा मध्ये सामाजिक कार्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे कार्य जोमाने सुरू ठेवण्यात जानवे पती-पत्नी यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे महिला जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याने त्यांच्या कामाची पावती त्यांना मिळाली आहे. त्याचबरोबर भाजपचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक दामोदर बठेजा यांच्यावरही भाजपने पदवीधर प्रकोष्ठ पदाची जबाबदारी दिली असून दामोदर बठेजा हे भाजपचे सुरुवातीपासूनचे कार्यकर्ते असून अनेक पद त्यांनी भूषवले आहेत. सिंधी समाजाचे प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी भारतीय जनता पार्टीचे काम तळागाळात रुजवले आहे.
प्रिया जानवे यांच्या निवडीबद्दल गुलमोहर रोड परिसरातील ॲड. लक्ष्मीकांत पठारे,अभय खाबिया, शिरीष जानवे,नितीन भाकरे,प्रदीप घोडके,विशाल साबळे,प्रसाद पाठक,पल्लवी पाठक,मुकूल गंधे ,राहूल आंधळे,राहूल राजापुरे रामदास आंधळे,अभिजीत लेकर यांनी अभिनंदन केले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular