अहमदनगर दि.१७ ऑक्टोबर
समृद्धी महामार्गावर दोन दिवसांपूर्वी भयानक अपघात होऊन बारा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही घटना रात्रीच्या सुमारास हवेवर उभ्या असलेल्या ट्रकला प्रवासी वाहनाने धडक दिल्यामुळे झाली होती. मात्र या घटनेनंतर एक व्हिडिओ समोर आला आणि या व्हिडिओमध्ये ही ट्रक आरटीओ अधिकाऱ्यांनी काढून उभी केली होती आणि त्यावेळेसच मागून प्रवासी वाहतूक करणारी गाडी येऊन तिने जोरदार धडक दिल्यामुळे त्या गाडीमधील बारा जणांचा जागीच मृत्यू झाला होता या कारणामुळे दोन आरटीओ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे .मात्र या घटनेनंतर एक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे आरटीओ अधिकारी भर रस्त्यात उभे राहून मोठमोठ्या ट्रक्स रस्त्याच्या कडेला उभा करून तपासणी करत असतात आणि त्यामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता निर्माण असताना याकडे आरटीओ अधिकारीच दुर्लक्ष करत असतात ही एक मोठी नवल करण्याची गोष्ट आहे.
यामागील दुसरा भाग असा की आरटीओ अधिकारी वाहनांची तपासणी करत असताना वाहनाचा फिटनेस ड्रायव्हरचा फिटनेस लायसन तसेच वाहनांची इन्शुरन्स ची कागदपत्रे वाहनाची कागदपत्रे त्याचबरोबर वाहनांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त म्हणजेच ओव्हरलोड माल भरलेला आहे का याची तपासणी करत असतात मात्र काही ठराविक गाड्या पकडल्यानंतरही या गाड्या सोडल्या जातात कारण कार्ड सिस्टीम जोरात सुरू असून या कार्ड सिस्टीम मुळे ठराविक गाड्यांना बिनदिक्कत प्रवास करू दिला जातो या गाड्या पकडल्या तरी त्यांचा नंबर त्या अधिकारांकडे असलेल्या लिस्टमध्ये असेल तर ती गाडी पाच मिनिटात सोडली जाते ठराविक नाव आणि सांकेतिक भाषा सांगितली की गाडी लगेच सोडली जाते. मात्र ज्या वाहनांकडे अशी कार्ड सिस्टीम नसेल त्या वाहनांवर हजारो लाखो रुपयांचा दंड आकारला जातो त्यामुळे ही कार्ड सिस्टीम बंद होणे गरजेचे आहे.कारण या कार्ड सिस्टीम मुळे शासनाचे पैसे हे ठराविक लोकांच्या खिशात जात आहेत. जो पैसा शासनाच्या तिजोरीत जायला हवा तो पैसा काही ठराविक लोकांच्या खिशात जात असल्यामुळे ही जमात गब्बर होत आहे. अहमदनगर शहरातही असे प्रकार सुरू असून काही ठराविक एजंट या कार्डच्या माध्यमातून मोठे गब्बर झाले आहेत.
या कार्डच्या बिजनेस मधून हॉटेलमध्ये काम करणारे वेटर सुद्धा सध्या अब्जधीश झाले असून एवढा मोठा हा कार्डचा व्यवसाय आहे. दर महिन्याला करोड रुपयांचा व्यवहार या कार्डचा माध्यमातून सुरू असतो मात्र प्रत्येक शहराचा दर हा वेगळा असून वाहन कोणत्या मार्गावर जाणार आहे त्या मार्गा वरील दर वेगवेगळे आहेत तसेच गाडी किती टायरची आहे त्यावरही या कार्डचा दर ठरवला जातो.
नागपूर पासून ते पेन पर्यंत तसेच जालन्यापासून मुंबईपर्यंत असे अनेक मुख्य महामार्ग असून या महामार्गांच्या मध्ये येणाऱ्या शहरांमध्ये ठराविक रक्कम घेऊन कार्ड वितरित केले जाते.दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत सर्व पैसा गोळा करून तो ठराविक अधिकाऱ्यांकडे दिला जातो आणि याचा मलिदा सर्वच लाभार्थ्यांना मिळत असतो त्यामुळे लाभार्थी आणि पैसे गोळा करणारे एजंट गब्बर झाले आहेत. जर ठराविक दिवसाच्या पुढे कार्डची रक्कम साहेबांकडे जमा केली नाही तर मग अशा गाड्यांवर पकडून लगेच दंडात्मक कारवाई केली जाते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी परिवहन खात्यात सुटसुटीतपणा आणावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अनेक सेवा ऑनलाईन सुरू झाल्या आहेत मात्र या सर्व गोष्टी चांगल्या होत असताना ओव्हरलोड गाड्यांची कार्ड ही पद्धत अजूनही चालूच आहे ही पद्धत कधी बंद होणार आणि ठराविक लोकांच्या खिशात जाणारा मलिदा हा शासनाच्या तिजोरीत कधी जाणार याकडे आता केंद्रीय मंत्र्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
क्रमशः
पुढे – भाग २- अहमदनगर मध्ये कसा चालतो कार्डचा बाजार