Home Uncategorized भाजपच्या पदाधिकाऱ्यावर खुनी हल्ला भाजप आमदाराच्या इशाऱ्यावरून…अहमदनगर मध्ये चाललंय काय ?

भाजपच्या पदाधिकाऱ्यावर खुनी हल्ला भाजप आमदाराच्या इशाऱ्यावरून…अहमदनगर मध्ये चाललंय काय ?

Lअहमदनगर दि.१४ डिसेंबर

पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळातील दोन गटात अध्यक्ष पदावरून हाणामारी होऊन सात जण जखमी झाले आहेत. या दोन्ही गटातील झालेल्या हाणामारीत लाट्या काठ्या व गज याचा वापर करण्यात आला.अध्यक्ष संजय मरकड,विश्वस्त विश्वजीत डोके व अन्य दोन जण जखमी झाले आहेत.

या जखमींना पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून अध्यक्ष संजय मरकड यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना अहमदनगर येथे हलवण्यात आले आहे हा हल्ला भाजपच्या आमदार मोनिका राजाळे यांच्या सांगण्यावरून झाला असल्याचा धक्कादायक आरोप जखमी झालेले अध्यक्ष संजय मरकड यांनी केला आहे. मोनिकाताई राजळे यांच्या घरी मला मारण्याचा प्लॅन झाला असल्यासही आरोप त्यांनी यावेळी केलाय

अनेक दिवसांपासून कानिफनाथ देवस्थानच्या ट्रसमधील अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव निवडी बाबत धुसपुस चालू होती. आज सकाळी देवस्थान समितीच्या सभागृहामध्ये सर्व विश्वस्त मंडळाची अध्यक्षपदाच्या निवडीबाबत बैठक बोलवण्यात आली होती त्या बैठकीतील मध्ये निवडीचा वाद उफाळून आला या जोरदार हाणामारी झाली. विश्वस्त मंडळामध्ये दोन गट पडले असून अनेक दिवसांपासूनचा हा वाद आज हाणामारी मुळे समोर आला. या हाणामारीमुळे नाद भक्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version