Home Uncategorized पौर्णिमेची मध्य रात्र … तीन मृतदेह ..पेटलेला अग्नी…अंगाला राख लावलेले अर्धनग्न तरुण...

पौर्णिमेची मध्य रात्र … तीन मृतदेह ..पेटलेला अग्नी…अंगाला राख लावलेले अर्धनग्न तरुण आणि कवटी घेऊन मंत्र म्हणत असलेला बाबा… अमरधाम मधील भयानक प्रकार..

Voodoo doll. Black magic witch esoteric ritual. Halloween concept

अहमदनगर दिनांक २४ मे (सुथो)

पौर्णिमेची मध्यरात्र रात्रीचे बारा वाजून गेलेले एका स्मशान भूमीत तीन प्रेतांना अग्नी दिली आहे ती प्रेते जळत आहेत आणि त्या ठिकाणी आजूबाजूला काही आज्ञात लोक अंगाला चीतेवरची राख अंगाला फासून चीते भोवती विचित्र कारणामे करतात ही दृश्ये आपण चित्रपटात अनेक वेळा पहिली आहेत. पण हे सत्य घडले आहे अहमदनगर मधील अमरधाम मध्ये दोन दिवसापूर्वी पौर्णिमेच्या मध्यरात्री अहमदनगर शहरातील अमरधाम येथे रात्री बारानंतर काही अज्ञात इसम अमरधाम मध्ये येऊन त्या ठिकाणी अग्नी दिलेल्या मृतदेहां जवळच एक तांत्रिकाच्या मदतीने काळी जादू करण्याचा प्रयत्न करत असणाऱ्या तंत्रिकासह काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. रात्री सुमारे दोन वाजता अंधाऱ्या रात्री पौर्णिमेच्या दिवशी हा जादूटण्याचा कार्यक्रम सुरू होता. काही स्थानिक तरुणांच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन व्हिडिओ शूटिंग काढण्याचा प्रयत्न केला मात्र सर्वत्र अंधार असल्यामुळे तुरळक शूटिंग या तरुणांच्या मोबाईल मध्ये चित्रित झाले.

एक भगवे कपडे घातलेला तांत्रिक आणि त्यांचे सोबत असलेले काही लोक अक्षरशः अंडर पॅन्ट वर उभे होते त्यांच्या संपूर्ण अंगावर राख लावलेली होती हात वर करून मंत्र जप सुरू होता. समोर तीन प्रेत जुळत होते. भगवे कपडे घातलेला तांत्रिक मंत्र म्हणत होता त्याच्यासमोर कवटी लिंब आणि पूजा साहित्य ठेवले होते अंगावर काटे आणणारा हा प्रसंग होता असे प्रत्यक्षदर्शनी सांगितले आहे. जे तरुण हे पाहण्यासाठी तिथे गेले त्यांच्या अंगावरही काही काटा आला होता त्यांनी घडत असलेल्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून थेट ११२ नंबर डायल करून पोलिसांना घटना कळवली आणि काही वेळातच त्या ठिकाणी कोतवाली पोलीस स्टेशनचे रात्र गस्तीवर असलेले पोलीस कर्मचारी अभी वाकचौरे सुजय हिवाळे आणि दीपक रोहकाले यांनी अमरधाम येथे धाव घेतली. पोलीस सुधा त्या ठिकाणचे दृश्य पाहून काही काळ हादरून गेले होते. परिस्थिती पाहून पोलिसांनी त्या ठिकाणी असलेले तांत्रिक आणि त्यांच्याबरोबर असलेल्या इसमांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात घेऊन गेले. त्यांची रात्रभर कसून चौकशी करण्यात आली.मात्र याबाबत कोणतीही तक्रार नसल्यामुळे सकाळपर्यंत वाट पाहून पोलिसांनी त्यांचे जबाब देऊन आणि सक्त ताकीद देऊन त्या तरुणांना आणि तांत्रिक बाबाला सोडून दिले.

तांत्रिक बाबाकडे हळदी कुंकू पूजेचे साहित्य होते तांत्रिक बाबा बरोबर जे लोक आले होते ते अहमदनगर जिल्हा बाहेरचे असल्याची माहिती मिळाली आहे आणि घरातील काही समस्या घेऊन ते बाबाकडे आले असल्यामुळे बाबांनी त्यांना त्यावर उपाय म्हणून काही गोष्टी करण्यासाठी सांगितल्या होत्या त्या करण्यासाठी हे तरुण आणि बाबा अमरधाम मध्ये आले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र एकीकडे जग चंद्रावर पोहचले असताना दुसरीकडे काळी जादू आणि जादूटोणे हा प्रकार अध्यापही सुरू आहे मात्र अशा घटनांमुळे अमरधाम मधील परिस्थिती समोर आली असून अशा घटना होऊ नये म्हणून अमरधाम परिसरात रात्री चौकीदार नेमावेत अशी मागणी ही आता नागरिकांकडून होत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version