अहिल्यानगर दिनांक 1 जानेवारी रक्ताची वाढती गरज लक्षात घेऊन सरत्या वर्षाला निरोप म्हणून जाणीव फाउंडेशन व ज़िल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने “ दारूच्या बाटल्या रीत्या करण्या ऐवजी रक्ताच्या पिशव्या भरुया “ या धर्तीवर, सालाबादाप्रमाणे ३१ डिसेंबरला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
जाणीव फाऊंडेशनच्या आवाहनाला प्रतिसाद देत १५३ इच्छुक रक्तदात्यांनी नेहमीप्रमाणे रक्तदान करुन या पुण्यकर्मात सहभागी होऊन रुग्णसेवा करण्याच्या अनोख्या सुवर्णसन्धीचा लाभ घेतला आहे. व्यावसायिक, सरकारी कर्मचारी, वाहन चालक, माजी सैनिक आदींनीही मोठ्या उत्साहात रक्तदान केले. विशेष म्हणजे या वर्षीही महिला रक्तदात्यांचा लक्षणीय सहभाग होता. कु शिवांशी चेमटे, कु सावनी दिघे या नवयुवतींनी तर सौ जया वाखुरे, सौ मंजुषा गायकवाड, सौ स्नेहल शेकडे, सौ वैशाली गर्जे व सौ देवयानी दिघे या महिलांनी रक्तदान केले.
जाणीव फाऊंडेशनच्या वतीने सर्व रक्तदात्यांना गृहोपयोगी वस्तू, प्रमाणपत्र व नवीन वर्षाचे कॅलेंडर भेट देण्यात आले. सर्व रक्त दात्यांसाठी चहा बिस्कीट व पौष्टिक नाश्त्याची व्यवस्था फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली होती.
जिल्हा रुग्णालय रक्त पेढीचा २०२४ चा पाच हजारावा रक्तदाता होण्याचा मान ज्येष्ठ नागरिक श्री राजन उत्तेकर यांना मिळाला.
जाणीव फाउंडेशनच्यावतीने बांधकाम व्यावसायिक प्रदीप वाखुरे,ॲड व नोटरी पब्लिक विक्रम वाडेकर (विश्वस्त श्री जगदंबा देवी ट्रस्ट, मोहटे), छायाचित्रकार राहुल जोशी, कर सल्लागार विकास जोशी, विमा सल्लागार राहुल काळे, प्रगतीशील शेतकरी शिवशर्मा चेमटे, दीपक भंडारी, बांधकाम व्यावसायिक सचिन निक्रड, विकास गायकवाड, संजय माने, विपुल वाखुरे, बाळासाहेब पवार, विनय वाखुरे, कैलास नवलानी, नगरसेवक उद्योजक अमोल गाडे, मनोज जेटला, युवराज तिपोळे, भूषण शिंदे, किशोर पवार, संग्राम पवार, सुनिल जगताप, आशिष सदावर्ते, आनंदराव पालेकर, माजी सैनिक आंबादास गवंडे, जिल्हा रुग्णालय रक्त पेढीतील मोहन पोकळे, ॲड. व इंजिनीअर कैलाश दिघे यांनीही इतरांसह रक्तदान करून शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.