अहिल्यानगर दिनांक 2 जानेवारी
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या हद्दीमधील डांबरी आणि सिमेंट क्रॉकीटीकरणाचे रस्ते विकास कामा करीता आलेल्या निधीचा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याची तक्रार उबाठा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख
गिरीष जाधव यांनी याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे 27 ऑगस्ट 2024 रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता. आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास करून गुन्हे दाखल करावी अशी मागणी गिरीश जाधव यांनी केली होती.
गिरीश जाधव यांचा अर्ज हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून आता महानगरपालिका आयुक्तांकडे वर्ग करण्यात आला असून अहिल्यानगर शहरात डांबरी व सिमेंट क्रॉकीटीकरणाचे रस्ते विकास कामा करीता आलेल्या निधीचा बांधकाम विभागांचे अधिकारी व नियुक्त ठेकेदार यांनी संगनमताने निकृष्ट दर्जा देत आर्थिक गैर व्यवहार केल्याची तक्रार करण्यात आली होती मात्र आता हा अर्ज पुन्हा महानगरपालिका आयुक्तांकडे वर्ग झाल्यामुळे महानगरपालिकेतील कर्मचारी आणि ठेकेदारांना अभय तर मिळणार तर नाही ना ? कारण गिरीश जाधव यांनी या अर्जामध्ये महानगरपालिकेच्या आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी ठेकेदारांवर संशय व्यक्त केला आहे.
मात्र आता यावर कायद्यानुसार चौकशी होऊन त्यामध्ये फौजदारी स्वरूपाचा अपहार आढळून आला तर गुन्हा दाखल होऊ शकतो. जर चौकशी अंती अपहार आढळून आला तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरूनच हा गुन्हा दाखल होणार आहे.