Home Uncategorized केबल टाकताना शॉक लागून एकाचा मृत्यू… रेल्वे स्टेशन परिसरात घडलेली घटना..

केबल टाकताना शॉक लागून एकाचा मृत्यू… रेल्वे स्टेशन परिसरात घडलेली घटना..

अहिल्यानगर दिनांक २३ मे

नगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात एका व्यक्तीचा केबल (टेलीव्हिजन) लावताना शॉक लागून मृत्यू झाला. नगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या संभाजी कॉलनी येथील मातोश्री आपारमेंट जवळ ही घटना घडली आहे.

शुक्रवारी दुपारी स्टेशन रोड परिसरातील संभाजी कॉलनी येथील मातोश्री अपार्टमेंट जवळ राजेश चाहील हे टेरेसवर टेलिव्हिजन केबल लावताना केबलला विजेचा शॉक लागला. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच या भागाचे माजी नगरसेवक प्रशांत गायकवाड यांनी तातडीने धाव घेत. महावितरण कंपनी तसेच अग्नि शामक दल आणि. रुग्णवाहिकेला फोन करून मदत करण्याचा प्रयत्न केला मात्र वीज वाहक तारा केबल वायरल चिकटल्यामुळे राजेश यांचा मृत्यू झाला होता.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version