अहमदनगर दिनांक २९ डिसेंबर
शाळा कॉलेज क्लास या नावाखाली घरातून निघालेल्या विद्यार्थ्यांना तरुण-तरुणींना एकांत मिळावा आणि अश्लील कृत्य करण्यास प्रोत्साहित करणाऱ्या कॉफी हाउसच्या नावाखाली सध्या अहमदनगर जिल्ह्यात नंगानाच सुरू आहे. याबाबत आवाज महाराष्ट्राचा यावे पोर्टलवरून गेल्या एक महिन्यापासून कॅफे हाउसच्या पडद्यामध्ये अंधुक उजेडातले खरे सत्य या सदराखाली मालिका सुरू आहे. आणि या सदरामध्ये जे लिहिलं आहे ती अत्यंत भयानक आणि खरी परिस्थिती आहे याचीच प्रचिती आज अहमदनगर मधील संगमनेर मध्ये उघडकीस आली आहे. संगमनेर शहर पोलिसांनी रहाणेमळ्यातील ‘रिलॅस कॅफे’ नावाच्या अशाच अश्लील कृत्याच्या केंद्रावर छापा घातला. यावेळी आतील आडोशांना सहा जोडपी आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आली. त्या सर्वांसह कॅफेचालक अभय गवळी याच्यावर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करुन रंगेहाथ पकडलेल्या सहा जोडप्यांना समज देवून सोडण्यात आले आहे.
कॅफे चालक आतील भागात तयार केलेल्या छोट्या छोट्या रूम वाजा बैठकीचा वापरानुसार पैसे आकारतात.पोलिसांनी कारवाई करताना आतील संपूर्ण भागाची पाहणी केली, त्यावेळी वापरलेले कंडोमही आढळून आले. त्यावरुन अशा ठिकाणांवर काय चालते याचाही प्रत्यय आला. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक फराहनाज पटेल करीत आहेत.
अहमदनगर शहरातही अनेक ठिकाणी कॅफे हाऊस अशाच प्रकारे सुरू आहेत मध्यंतरी काही कॅफे हाऊसवर पोलिसांनी कारवाई केली मात्र पुन्हा दुसऱ्या दिवशी हे कॅफे हाऊस जोमाने सुरू झाले आहेत.