Homeशहरशहरातील पाच कॅफे शॉप चालकांविरुद्ध गुन्हे दाखल... पडद्या मागील सत्य काय...

शहरातील पाच कॅफे शॉप चालकांविरुद्ध गुन्हे दाखल… पडद्या मागील सत्य काय या मालिकेचा परिणाम…

advertisement

अहमदनगर दिनांक ९ डिसेंबर
अहमदनगर शहरात सुरू असलेल्या अंधुक उजेडातील खरं सत्य या मथळ्याखाली “आवाज महाराष्ट्राचा” या वेबपोर्टल वरून खरी वस्तुस्थिती मांडली होती अनेक शालेय मुली शाळेच्या ड्रेसवर आणि विद्यार्थी या कॅफे हाऊस मध्ये खुल्या जायक करत असल्याचे सत्य मानलं होतं आणि आता ते सत्य किती खरे आहे हे आजच्या कारवाईवरून दिसून आले आहे.

अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या 1) कोहीनुर ऑर्केड बिल्डींगमध्ये बेसमेंट मध्ये असलेले कॅफे स्टेला 2) बालिकाश्रम रोड येथे डाऊन कॅफे, 3) पारिजात चौक, गुलमोहर रोड, येथे हंगरेला कॅफे, 4) प्रेमदान चौक, तारापान शेजारी द व्हेनी कॅफे, 5) पंपिंग स्टेशन रोड, ताठे नगर, येथे वन स्टार कॅफे अशा विवीध कॅफे हाऊसवर पोलीसांनी छापा टाकला असता या ठिकाणी अत्यंत भयानक परिस्थिती आढळून आली या कॅफेमध्ये कॅफे शॉपचे चालक कॉफी शॉप बोर्ड लावुन कुठलाही कॉफी हा पेय तसेच इतर कुठलेही खाद्य पदार्थ विक्रीसाठी न ठेवता आतमध्ये लाकडी कंपार्टमेंट बनवुन त्यास बाहेरुन पडदे लावुन आतमध्ये बसण्यासाठी सोफे ठेवुन मुला मुलींना बसण्यासाठी व अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देत असल्याचं आढळून आलं.

तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी ही धाडसी कारवाई केली असून कॅफे स्टेला, कोहीनुर ऑर्केड बिल्डींग, ता.जि.अमदनगर याचा चालक फरहाण सरफराज शेख, वय-28 वर्ष, रा.दौंण्ड रोड, हॉटेल शितलमागे, केडगाव, ता.जि.अहमदनगर 2) डाऊन कॅफे, बालिकाश्रम रोड, ता.जि.अमदनगर चालक शक्ती मनोहर सिंग वय 21 वर्षेरा.भिमा सिकर, भिमा , राज्य राजस्थान 3) हंगरेला कॅफे चालक विशाल भाऊसाहेब पालवे वय 24 वर्षे रा. कोल्हार ता पाथर्डी जि अहमदनगर 4) शहरातील प्रेमदान चौक, तारापान शेजारी द व्हेनी कॅफे चालक रंजीत जवाहर पंडित वय 20 वर्षे मुळ रा.इंदिरानगर एफ 44, टेल्को रोड, चिंचवड स्टेशन जवळ, पंचशील हॉटेल पुणे 5) वन स्टार कॅफे येथे कॉफी शॉप चालक ओंकार कैलास ताठे वय 23 वर्षे रा. ताठे नगर, सावेडी ता नगर जि-अहमदनगर यांच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 129, 131 (क) (क) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जेव्हा पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी शॉप मध्ये
मिळुन आलेल्या मुला मुलींना तोंडी समज देवुन सोडण्यात आले आहे. आणि पोलिसांनी कॅफे शॉप ची तपासणी केली असा त्या ठिकाणी कॅफे किंवा चहा बनवण्याची कोणतीही साधन आढळून आले नाही हे विशेष मात्र बाहेर कॉफी मिळण्याचे मोठमोठे बोर्ड लावण्यात आले होते.

ही कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उप विभागीय पोलीस अधिकारी, अहमदनगर शहर विभाग .अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखालील पो.नि .मधुकर साळवे यांच्या पथकातील पो.उपनिरी सचिन रणशेवरे, पो.हे.कॉ दत्तात्रय जपे, सुनिल शिरसाट, दिनेश मोरे, पो.ना.अविनाश वाकचौरे, संदिप धामणे, वसिम पठाण, अहमद इनामदार, भानुदास खेडकर, सुरज वाबळे, पो.कॉ.सुमित गवळी, सतिष त्रिभुवन, दत्तात्रय कोतकर, सचिन जगताप, शिरीष तरटे, सतिष भवर, यांनी केली आहे.

मधुकर साळवे, पोलीस निरीक्षक, तोफखाना पोलीस स्टेशन, अहमदनगर यांच्याकडुन नागरीकांना नम्र आवाहन …..
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, कॉलेज, क्लासेसला जाणाऱ्या मुलांच्या नातेवाईकांनी आपल्या पाल्याच्या वर्तनुकीवर बारकाईने व जबादारीने लक्ष ठेवावे. आपल्या पाल्याचे मित्र कोण आहेत, ते बाहेर काही टवाळखोरी करतात काय ? या बाबत बारकाईने लक्ष ठेवावे. यापुढे असे टवाळखोर व सार्वजनिक ठिकणी बेशिस्त वर्तनुक करणारी इसमे अढळुन आल्यास तोफखाना पोलीस स्टेशनकडुन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची खबरदारी घ्यावी.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular