HomeUncategorizedतोफखाना पोलिसांनी केलेल्या कारवाईचे स्वागत... आम्ही मांडलेले सत्य बाहेर आलंच बंद...

तोफखाना पोलिसांनी केलेल्या कारवाईचे स्वागत… आम्ही मांडलेले सत्य बाहेर आलंच बंद खोलीत मंद प्रकाशात काय चालत होते हे नगरकरांनाही कळलं…. कॅफे चालकांवर नुसता गुन्हा दाखल करून उपयोग नाही तर संपूर्ण कॅफे उध्वस्त होणे गरजेचे… ये तो सिर्फ झाकी है.. नगर मे और कुछ बाकी है…

advertisement

अहमदनगर दि.९ डिसेंबर

अहमदनगर शहरातील अवैद्य असणाऱ्या कॅफे शॉप वर तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे आणि त्यांच्या पथकाने छापा टाकून मोठी कारवाई करत पाच कॅफे चालकांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईचं नगरकरांकडून स्वागत होत आहे. कारण कॅफेच्या नावाखाली या ठिकाणी बंद खोलीत नेमकं काय चाललं होतं हे आम्ही सांगितलं होतं मात्र ते सत्य पोलिसांनी उजेडात आणलं त्यामुळे अशा कॉफे चालकांवर कठोरात कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.

कॅफेच्या नावाखाली अंधुक प्रकाशात बंद खोलीत नेमकं काय चाललंय याबाबत “आवाज महाराष्ट्राचा” या वेब पोर्टलच्या माध्यमातून आम्ही सविस्तर लेखमाला लावली होती. यामध्ये या कॅफे हाऊसचे काम कशा प्रकारे चालते कशाप्रकारे तरुण-तरुणींना एकांत मिळेल याची सोय केली जाते. विशेष म्हणजे थेट शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या कॅफे हाउसच्या पायऱ्या चढू लागल्यामुळे या प्रकाराचं गांभीर्य वाढले होते. अल्लड वयात आपण काय करतो हे त्या मुलांना कळत नसतं मात्र जे कॅफे चालक असतात यांना ते समजायला हवं होतं पैशासाठी काहीही करायचं आणि पैसे कमवायचे आणि पैशाच्या हव्यासापाई आणि मोहापाई जर उमलत्या वयात विद्यार्थ्यांचं आयुष्य अंधारात ढकलणाऱ्या या कॉफे चालकांवर कोठारात कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.

नगर शहरात तोफखाना पोलिसांनी कॅफे स्टेला, कोहीनुर ऑर्केड बिल्डींग, ता.जि.अमदनगर याचा चालक फरहाण सरफराज शेख, वय-28 वर्ष, रा.दौंण्ड रोड, हॉटेल शितलमागे, केडगाव, ता.जि.अहमदनगर 2) डाऊन कॅफे, बालिकाश्रम रोड, ता.जि.अमदनगर चालक शक्ती मनोहर सिंग वय 21 वर्षेरा.भिमा सिकर, भिमा , राज्य राजस्थान 3) हंगरेला कॅफे चालक विशाल भाऊसाहेब पालवे वय 24 वर्षे रा. कोल्हार ता पाथर्डी जि अहमदनगर 4) शहरातील प्रेमदान चौक, तारापान शेजारी द व्हेनी कॅफे चालक रंजीत जवाहर पंडित वय 20 वर्षे मुळ रा.इंदिरानगर एफ 44, टेल्को रोड, चिंचवड स्टेशन जवळ, पंचशील हॉटेल पुणे 5) वन स्टार कॅफे येथे कॉफी शॉप चालक ओंकार कैलास ताठे वय 23 वर्षे रा. ताठे नगर, सावेडी ता नगर जि-अहमदनगर यांच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 129, 131 (क) (क) प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत.

मात्र अशा कॅफे चालकांवर गुन्हे दाखल करून या कॅफे चालकांनी कॉफी दुकादारांनी आपल्या दुकानाची आतून जी मांडणी केली आहे ती मांडणी उध्वस्त करणे गरजेचे आहे की जेणेकरून पुन्हा असे प्रकार हे कॅफे चालक करणार नाही. शालेय विद्यार्थ्यांचं जीवन उद्ध्वस्त करणारा या कॅफे संस्कृतीचे समूळ उच्चाटन होणे गरजेचे आहे. त्यामुळे फक्त या मालकांवर कारवाई न करता सर्व कॅफे उध्वस्त होणे गरजेचे आहे तरच ही कॅफे संस्कृती संपुष्टातील अन्यथा दोन दिवसानंतर पुन्हा कॅफे चालू होतील आणि पुन्हा अंधुक प्रकाशातला पडद्यमागचा खेळ सुरू होईल..

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular