अहमदनगर दि.१८ ऑक्टोबर
केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या विरोधात सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करण्यात आले आह. केंद्र शासन आणि राज्य शासनाने दिलेल्या वचनांचा विसर सरकारला पडला असून सर्वसामान्य जनतेला कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते यावर ही चर्चा होणार आहे. शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक हे प्रत्येक वार्डात जाऊन सर्वसामान्य जनतेबरोबर या विषयावर चर्चा करणार आहेत.
शहरातून शहर शिवसेनेच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव
बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार होऊ द्या चर्चा
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपतीची आरती करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात माळीवाडा,पंचपीर चावडी, कापड बाजार, चितळे रोड
परिसरामध्ये शिवसेनेच्या नेत्यांनी नगरसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेशी चर्चा केली.
महागाई बेरोजगारी नोटाबंदीनंतर उद्भवणारी समस्या गॅस टाकी दरवाढ, पेट्रोल डिझेल दरवाढ तसेच खाद्य तेल आणि दर महिन्यालालागणाऱ्या किरणा माल वस्तूंमध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात दरवाढ झाली आहे. मात्र त्या प्रमाणात रोजगार उपलब्ध नसल्याने अनेक लोकांना या महागाईच्या समस्याला तोंड द्यावे लागत आहे. या सर्व प्रश्नांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आवाज उठवला जाणार आहे.
शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर ,माजी नगरसेवक संजय शेंडगे, नगरसेवक योगीराज गाडे,उपशहर प्रमुख संदीप दातरंगे ,पप्पू भाले यांच्या सह शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.