Homeशहरछोट्या चेतन चे ताब्याचे मोठे प्रताप.... नगर शहरात ताब्याचे नवनवीन प्रकार जे...

छोट्या चेतन चे ताब्याचे मोठे प्रताप…. नगर शहरात ताब्याचे नवनवीन प्रकार जे जगात कुठेही होऊ शकत नाही…

advertisement

अहमदनगर दि.१० सप्टेंबर

अहमदनगर शहरात ताबे मारण्याचे प्रकार आता नवीन नाहीत. या ताब्या प्रकरणावर “आवाज महाराष्ट्राचा” वेब पोर्टल माध्यमातून अनेक मालिका लावून ताब्याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला गेला तर अनेक ताब्यांबाबत वाचा फोडण्यात आली काही प्रमाणात याला यशही आले असून गुन्हेही दाखल झाले आहेत.

मात्र नगर शहरात ताबे मारण्याचे प्रकार थांबता थांबत नसल्याचे दिसून येत आहेत. आता तर ताब्या मारणाऱ्यांनी नवीन फंडे अमलात आणले असून यामुळे सर्वसामान्य माणूस संपूर्ण उद्ध्वस्त होऊ शकतो असे प्रकार सध्या नगर शहरात सुरू आहेत.

अहमदनगर शहरात आता ताबे मारण्याचा नवीन प्रकार आला असून एखाद्याची जागा विकायची असेल तर जागा विक्रीचा व्यवहार पद्धतशीरपणे करायचा समोरच्या जागा मलकाबरोबर सर्व कायदेशीर व्यावहार करून दोन्ही बाजूने कागदपत्रे करून घ्यायचे जागा मालकाला साठे खताच्या मोबदला द्यायचा आणि कागदपत्रांवर सह्या करून घ्यायच्या इथपर्यंत जागा विक्री करणारा मालक सर्व काही विश्वासावर करत असतो मात्र जेव्हा त्याला काही कालावधीनंतर कळते की आपण आपली एकच जागा नाही तर आपल्या नावावर असलेल्या सर्व जागा विक्री केल्या आहेत तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते कारण करोडो रुपयांची जागा लाखो रुपयांच्या साठेखतावर लिहून दिली गेलेली असते मात्र जेव्हा जागा मालक सही करत असतो तेव्हा त्याच्या ते लक्षात येत नाही कालांतराने ही गोष्ट त्याला समजल्यानंतर त्याला चांगलाच मानसिक धक्का बसतोय… ही गोष्ट चित्रपटात अथवा काल्पनिक असू शकते असं प्रथम दर्शनी वाटते मात्र तसे नाही तर नगर शहरात असे प्रकार घडले असून घडत आहेत. छोटा चेतन चित्रपटात आपण अनेक जादू पाहिले आहेत त्याप्रमाणे नगर शहरातील छोटा चेतन ही अशा जादू करत असून त्यामुळे नगर शहरातील काहीजण फसले गेले आहेत. छोटा चेतनच्या या जादूची नगर शहरात चांगलीच जोरदार चर्चा सुरू आहे म्हणजेच हा ताबा मारण्याचा नवीन प्रकार सध्या नगर शहरात अंमलात आलेला आहे.

अहमदनगर शहर हे इतिहास घडवण्यात माहीर आहे. अहमदनगर शहरात अनेक इतिहास घडलेले आहेत. विशेष म्हणजे काल परवा एक कोटी रुपयांची लाच नगर शहरात स्वीकारली गेली ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे. त्याचप्रमाणे आता नगर शहरातील छोटा चेतनच्या अशा साठेखताची आणि ताबा मारण्याच्या पद्धतीची चांगलीच चर्चा सुरू आहे. त्यामुळे नगर शहरात ताब्या मारण्याच्या इतिहासात याची नोंद होऊ शकते.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular