Homeशहरजुन्या तिकिटावर पुन्हा नवीन खेळ... विरोध झालेल्या संस्थेला महानगरपालिकेने ठेका देऊन भटक्या...

जुन्या तिकिटावर पुन्हा नवीन खेळ… विरोध झालेल्या संस्थेला महानगरपालिकेने ठेका देऊन भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीचा सुरू केला खेळ.. भटके कुत्रे पिल्लं देत आहेत मात्र त्यांचा बाप कोण अद्यापही समजेना! जनतेचा पैसा वाया जातोय कोणीच काही बोलेना!

advertisement

अहमदनगर दि.१० नोव्हेंबर

सोशल मीडियामध्ये मध्यंतरी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता या व्हिडिओमध्ये एका बंगल्याच्या आवारात एका इसमास एक कुत्रे अक्षरशः कपडे फाडून त्याचा चावा घेत आहे असे अत्यंत भयानक दृश्य चित्रित झाले होते. त्या ठिकाणी गेटच्या बाहेर अनेक नागरिक उपस्थित होते मात्र हे नागरिक सुद्धा त्या इसमाचा बचाव करू शकत नाही अशी परिस्थिती या व्हिडिओ मधून दिसून येत होती. तर प्रसिद्ध वाघ बकरी चहाचे मालक यांचा मृत्यूही सकाळी फिरायला जात असताना मागे लागलेल्या भटक्या कुत्र्यांच्या तावडीतून सुटका करत असताना अडखळून पडून डोक्याला इजा होऊन मृत्यू झाल्याची घटनाही ताजी आहे. अशाच प्रकारे अहमदनगर शहरातही लहान बालके आणि वयोवृद्ध लोकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने मृत्यू पडल्याची घटनाही घडलेल्या आहेत.

या भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी नर आणि मादी कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी महानगरपालिकेने खाजगी संस्थेत नसबंदी करण्यासाठी ठेका दिला होता या नसबंदी करणाऱ्या संस्थेने 2022 पर्यंत लाखो रुपयांची बिले वसूल केली आहेत. प्रतिश्वन 900 रुपयांचा खर्च या खाजगी संस्थेस महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येतो 2022 मध्ये महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार ५ जुलै २०२१ ते ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत २११३ नर कुत्रे तर १३६३ मादी कुत्रे यांची नसबंदी केली असून या पोटी लाखो रुपयांची बिले वेळोवेळी महानगरपालिकेकडून अदा करण्यात आली आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात जर नसबंदी झाली असेल तर मग आजही अनेक ठिकाणी या भटक्या कुत्र्यांना पिल्लं होत असल्याचं आढळून येत आहे. महानगरपालिकेने एवढा मोठा लाखोंचा खर्च करूनही जर तीच परिस्थिती असेल तर हा खर्च वाया गेला असेच म्हणावे लागेल.

रात्री अहमदनगर शहरात दुचाकीवरून फिरायचे म्हणजे साक्षात मृत्यूच्या दारात पोहोचण्यासारखा हा प्रवास असतो कारण प्रत्येक चौकात चौकात भटक्या कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी बसलेल्या असतात एक कुत्र जरी एखाद्या दुचाकी मागे लागले तर त्यामागे सर्व कुत्रे धावत सुटतात. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी दुचाकी स्वार गाडी जोरात चालवण्याचा प्रयत्न अनेक वेळा अपघात झालेले आहेत.

2021 – 22 मध्ये ज्या ठेकेदार संस्थेला कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी ठेका दिला होता त्यावेळी मोठा गदारोळ झाला होता अनेकांनी या त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप केले होते. पुन्हा त्या संस्थेला ठेका देऊ नये असे पत्रही महानगरपालिकेला देण्यात आले होते. मात्र पुन्हा सर्वांच्या नाकावर टिच्चून त्याच ठेकेदार संस्थेला नसबंदी करण्याचा ठेका दिला असून पुन्हा जुन्या तिकिटावर नवीन खेळ सुरू झाला आहे जनतेच्या खिशातील पैसा हा असा उडवला जात असेल आणि जनता पाहत बसत असेल तर अशी बेजबाबदार जनता आणि राजकीय पदाधिकारी कुठेच नसेल!

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular