Home शहर पुण्याच्या पाट्यांचा नेमचीच बोलबाला असतो मात्र नागरकरही काही कमी नाहीत ‘ही’ गंभीर...

पुण्याच्या पाट्यांचा नेमचीच बोलबाला असतो मात्र नागरकरही काही कमी नाहीत ‘ही’ गंभीर सूचना आपण वाचली का ?

अहमदनगर दि.२७ मे
पाट्या आणि पुणे एक वेगळं नातं निर्माण झाला आहे पुण्याच्या पाट्यांचा बोलबाला अख्ख्या जगभर आहे मग पाटी रस्त्यांच्या दिशादर्शकाची असो अथवा काही सूचना असो किंवा एखाद्याला धमकी,प्रेम व्यक्त करण्याची असो पुण्याच्या सर्वच पाट्या ह्या वेगळ्या प्रकारे चर्चिल्या जातात.

मात्र नगर शहरातही अशी एक सूचनेची पाटी आहे. तिची चर्चा सध्या सावेडी परिसरात जोरदार सुरू आहे. अहमदनगर महानगरपालिकेच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या पादचारी मार्गावर अनेक व्यवसायिक आपला व्यवसाय करत असतात. मात्र काही लोकांच्या घरासमोर अथवा गृहनिर्माण संस्थेच्या गेट समोर हा व्यवसाय असल्याने या ठिकाणी राहत असलेल्या नागरिकांना नेहमीच त्रासाला समोर जावे लागते स्वतःच्या घरात जाताना सुद्धा याठिकाणी असलेल्या व्यवसाय करणारे व्यावसायिक आणि येणाऱ्या ग्राहकांची वाहने ओलांडून घरात अथवा कॉलनीत प्रवेश करावा लागतो वेळ प्रसंगी याठिकाणी बसणारे व्यावसायिक आणि ग्राहकांशी वाद हॆतात. महानगरपालिकेला कळवूनही अशा व्यावसायिकांवर जुजबी कारवाई होते.

त्यामुळे कॉलनीच्या कंपाऊंडच्या भिंतीवरच एका व्यक्तीने सूचना लिहून या ठिकाणी बसलेल्या व्यावसाय करून वस्तू घेऊ नका असं सांगतानाच या ठिकाणी कोणत्या गंभीर घटना घडल्या आहेत अशी पाटी लुहली आहे. सूचना पाटी मजेदार आणि गंभीरही आहे मात्र या सूचनेकडे खरंच नागरिक लक्ष देतात का? किंवा महानगरपालिका अतिक्रमण विभाग अशा गंभीर प्रश्नाकडे लक्ष देणार का हा एक चर्चेचा विषय आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version