अहमदनगर दि.१६ ऑगस्ट
अहमदनगर शहराच्या लगत असणाऱ्या कापूरवाडी परिसरामध्ये गावठी हातभट्टी दारू बनवणाऱ्या अड्ड्यावर शहर उपाधीक्षक पथकाने छापा टाकून हजारो लिटर दारू नष्ट करत 43000 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हददीतील कापुरवाडी शिवारातील गोपाळवस्ती येथे जावुन त्या ठिकाणी गावठी हातभटटीची दारु बनविण्याकरीता लागणारी साधन सामुग्री कच्चे रसायन व गावठी हातभटटीची तयार दारु मिळुन सुमारे 43000 हजार रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे.या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात मपोकॉ/१४४४ दिपाली दिलीप भालेराव यांच्या फिर्यादी नुसार कलाबाई पवार या महिलेवर महाराष्ट्र दारुबंदी कायदा अधिनियम ६५ (ई) (फ) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.