Home Uncategorized क्लेराब्रुसची जागा भू माफिया व कब्जा ठोक गॅंगकडून बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई...

क्लेराब्रुसची जागा भू माफिया व कब्जा ठोक गॅंगकडून बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. संबंधित आरोपींवर मोक्का अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी. अन्यथा समाज बांधवांच्या वतीने अमरण उपोषण

अहमदनगर दि.१ जून

सशहरातील क्लेरा ब्रूस हायस्कूल या संस्थेच्या मालकीची मालमत्ता दिनांक २८  मे रोजी रात्री १२ ते २-वाजेच्या सुमारास शहरातील काही भू माफिया व कब्जा ठोक गॅंगची मराठी मिशन संचलित क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल च्या शाळेचे गेटचे कंपाउंड चे कुलूप तोडून अनधिकृतपणे 100 ते 150 गुंड हातात शस्त्र लाठीकाठी घेऊन ताबा कब्जा मारण्याच्या हेतूने आत शिरले व मिळकतीवर बाळाचा व गुंडगिरीचा तसेच खून खराबा करण्याच्या धमक्या देऊन कब्जा मारण्याचा प्रयत्न केला. व परिसरात अशांतता निर्माण केली. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मराठी मिशनचे डि.जी. भांबळे समवेत डॉ.विजया जाधव, रेव्ह.बिपीनजॉन मायकल, शिवसेनेचे माजी शहर प्रमुख  दिलीप सातपुते, माजी महापौर अभिषेक कळमकर, राजू देठे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

क्लेरा ब्रुस शाळेच्या कंपाऊंड चे कुलूप तोडून हातात तलवारी काटया घेऊन गुंड लोकांनी अनधिकृतपणे जागेचा कब्जा गुंडगिरी व बळाच्या जोरावर घेण्यासाठी तीन ट्रक मध्ये पत्र्याचे शेड साहित्य एक जीसीपी व एक सिमेंट काँक्रीट मिक्सर ट्रक घेऊन प्रवेश करून मोठे मोठे खड्डे जेसीबीच्या साह्याने तयार करून कब्जा ठोकण्याच्या प्रयत्न केला.

त्यावेळी ख्रिश्चन समाजाचे तरुण गोळा झाले व त्यांना बेकायदेशीर कब्जा घेण्यास प्रतिबंध केले. सदर घटनेसंदर्भात कोतवाली पोलीस स्टेशन येथे नागरिक तक्रार देण्यासाठी गेले असता तक्रार नोंदवून घेतलेली नाही. त्यावेळी आम्ही आल्यानंतर माहिती घेतली तेव्हा अजय पाटोळे रा. क्लेराब्रुस गर्ल्स हायस्कूल कंपाऊंड यांनी माहिती दिली की येथे ट्रक एम एच १६ ए.ई १७७३/ एम एच १६ ए.ई ९०९७/ एम एच १६ ए.ई ५८२८ असून एक जेसीपी एक काँक्रीट मिक्सर मशीन ट्रक गाडी व सुमारे 100 ते 150 गुंड लोक गेटचे कुलूप तोडून मोठ्याने ओरडत कोणी मध्ये आल्यास खून खराबा करू अशा धमक्या देत जेसीबीने खड्डे खोदण्यास सुरुवात केली. असे अजय पाटोळे यांनी सांगितले की तेथे 100ते 150 जण होतें. व त्याच वेळी बाहेर एक चार चाकी वाहन होती त्याचा क्रमांक एम.एच १९००९ गाडी उभी होती व त्यातील एक व्यक्ती ही लोकांना बेकायदेशीर काम करण्यास चिथावणी देत होती.

यापूर्वीही जागेमध्ये बाळाचा व गुंडगिरीचा वापर करून जागा ताबा व कब्जा घेण्याचा प्रकार घडलेला आहे याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे व शांततेचा भंग करू नये म्हणून 145 व 146 अन्वये फौजदारी स्वरूपाची कारवाई यापूर्वी झालेली आहे मिळकतीचे वाद कोर्टात चालू असून 100 ते 150 लोक गुंड साथीदार गाड्यांचे मालक-चालक संगम मताने कटकारस्थान करून आमच्या शाळेचा जागेचा ताबा कब्जा वापर व वहिवाटीची मिळकती मध्ये कब्जा ठोकण्याचा प्रयत्न करत आहे व तेथे म्हणत होते की आमचे कोणी काही करू शकत नाही आम्ही आजपर्यंत अनेक मिळकतीचे ताबे कब्जे घेतलेले आहे पोलीस स्टेशन व अधिकारी आमच्या हातात आहे सदर सर्व बाबींमुळे आमचे परिसरात अशांतता निर्माण झालेली आहे

दोन समाजात मोठा संघर्ष होऊन मोठी जीवित व वित्तहानी झाली असती परंतु वेळीच पोलीस आल्यामुळे व ३ ट्रक साहित्या सह कोतवाली पोलिस स्टेशन येथे जप्त करून घेऊन गेल्यामुळे मोठी जीवित व वित्त हानी तळी काही लोकांकडे पिस्तूल व ते होते असे समजते व ते खूनखराबा करण्यासाठी आले होते. त्यामुळे आमची फिर्याद नोंदवून घ्यावी व संबंधित गुंडांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करावी व परिसरात येण्यास प्रतिबंध करावा तसेच झोपडपट्टी दादा कायदा अंतर्गत तडीपारीची कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version