Homeशहरनगररचना म्हणजे कॉइन बॉक्स... पैसे टाका आणि हवे ते काम करून घ्या......

नगररचना म्हणजे कॉइन बॉक्स… पैसे टाका आणि हवे ते काम करून घ्या… चौपटी कारंजा परिसरात बिल्डरला खुश करण्याच्या नादात सर्वसामान्य नागरिकाच्या पोटावर नगररचना विभागाची लाथ…

advertisement

अहिल्यानगर दिनांक ११ फेब्रुवारी

अहिल्यानगर महानगरपालिकेचा नगररचना विभाग नेहमीच विविध वादग्रस्त कारणामुळे सतत चर्चेत राहत असतो. या ठिकाणी मोठ्या उद्योजकापासून ते सर्वसामान्य माणसाला घर बांधण्यासाठी नेहमीच चकरा मारावा लागतात मात्र आजपर्यंत नगररचना विभागातून एकही माणूस समाधानाने परत गेलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. अनेक चकरा मारल्यानंतर संबंधित नागरिकाचे काम होते त्यामुळे परत या विभागात काम पडायला नको अशीच भावना घेऊन सर्वसामान्य नागरिक या कार्यालयातून बाहेर पडताना विचार करतो. लक्ष्मी दर्शन झाल्याशिवाय येथे फाईल हलत नाही अशी सर्वसामान्य नगरकरांपासून ते अनेक मोठमोठ्या बिल्डरांपर्यंत चर्चा आहे. नगररचना विभागाबद्दल आतापर्यंत अनेक नागरिकांनी महापौरांनी आजी माजी नगरसेवकांनी तक्रार करूनही येथील कारभार सुधारलेला नाही हे विशेष.

आता तर एक नवीन धक्कादायक प्रकार समोर आले असून नगर शहरातील चौपाटी कारंजा परिसरात असलेल्या ५९४८/१ या क्रमांकाच्या भूखंडावर महानगरपालिकेच्या याच नगररचना विभागाने एका बिल्डरला खुश करण्यासाठी थेट पार्किंग दाखवली आहे आणि बिल्डरला खुश केले आहे. मात्र बिल्डरला खुश करण्याच्या नादात या जागेवर सध्या अनेक वर्षांपासून सायकल विक्री आणि दुरुस्तीचे दुकान असून ज्यावेळेस नगररचना विभागाचे अधिकारी कर्मचारी इंजिनिअर या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेले होते त्यावेळेस त्यांना हे अनेक वर्षांपासून असलेले जुने दुकान दिसले नाही का ? हा प्रश्न समोर येतोय मात्र कोणाला तरी खुश करण्यासाठी सर्वसामान्य कष्टकरी नागरिकाच्या पोटावर लाथ मारण्याचा कारनामा नगररचना विभागाने केला आहे.

चौपाटी कारंजा परिसरात ज्यावेळेस मोठ्या बिल्डरचे बांधकाम सुरू झाल्यानंतर शेजारी असलेल्या मयूर बोचुघोळ यांना संशय आल्याने त्यांनी महापालिकेत जाऊन माहिती घेतली असता त्यांना मोठा धक्का बसला कारण त्यांची स्वतःच्या मालकीची असलेल्या जागेवर म्हणजेच ५९४८/१ या क्रमांकाच्या जागेवर
महानगरपालिकेने वाहनतळ ( पार्किंग )असल्याचं दाखवले होते याचा फायदा त्या मोठ्या बिल्डरला होणार होता यावरूनच मोठे लक्ष्मी दर्शन झाल्याशिवाय हा प्रकार घडला नसावा अशी चर्चा महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी सुरू केली होती.

याप्रकरणी मयूर बोचुघोळ यांनी तात्काळ महानगरपालिकेला 16 सप्टेंबर 2024 रोजी पत्र देऊन
५९४८/१ मध्ये माझी जागा असून महापालिकेची दिशाभूल करून तत्कालीन अधिकारी व संबधित इंजीनियर यांनी माझ्या जागेवर (पार्किंग) वाहनतळ दाखवून माझे जागेचा विनापरवानगी दुरुपयोग केला आहे. सदरील काम हे रोड वर बांधकाम साहित्य टाकून अवास्तव पध्दतीने व बेकादेशीर सुरु आहे. अशा आशयाचे पत्र देऊन तक्रार केली होती मात्र तरीही अद्याप या तक्रारीवर महानगरपालिकेने साधे उत्तर देण्याचे दायित्व दाखवले नाही.

याप्रकरणी जागामालक मयूर बोचुघोळ यांनी 27 जानेवारी 2025 ला मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना निवेदन पाठवून याप्रकरणी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत मयूर बोचुघोळ यांनी महानगरपालिकेत नगररचना विभागात अनेक वेळा चकरा मारूनही त्यांच्या पदरी निराशाच आली आहे. सर्व कागदपत्रे देऊनही महानगरपालिकेचे अधिकारी याबाबत कारवाई करण्यास तयार नाहीत यावरूनच महानगरपालिकेच्या गेंड्याच्या कातडीचा कामाचा अनुभव समोर येत असून सर्वसामान्य नागरिकला वेठीस धरण्याचे काम महानगरपालिकेचे नगर रचना विभागातील अधिकारी आणि कर्मचारी करत असल्याचा आरोपही मयूर बोचुघोळ यांनी केला आहे.

नगररचना विभागात बडा मोठा बिल्डर काम घेऊन आला तर त्याला पायघड्या घातल्या जातात तर सर्वसामान्य माणूस आला तर त्याची हेटाळणी केली जाते.अनेक वेळा चकरा मारायला लावल्या जातात अखेर वैतागून तो नागरिक संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्याला लक्ष्मी दर्शन देऊन आपले काम करून घेतो. लक्ष्मी दर्शन घेण्यासाठीच नगरचना विभागातील अधिकारी आणि कर्मचारी सर्वसामान्य नागरिकाला चकरा मारायला लावत असल्याचा आरोपही अनेक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे नगररचना कार्यालयातील वर्षानुवर्षी एकाच जागी असलेल्या कर्मचाऱ्यांची आणि मुजोर अधिकाऱ्यांची बदली करावी अशी मागणी मयूर बोचुघोळ यांनी केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular