अहिल्यानगर दिनांक 10 फेब्रुवारी
अहिल्यानगर शहरात झेंडीगेट भागात मोठ्या प्रमाणात गोमांस कत्तलखाने अवैधरित्या सुरू असल्यामुळे या ठिकाणी अनेक वेळा पोलिसांनी छापे टाकून गोमांस जप्त केले आहे. मात्र तरीही काही ठराविक लोक पुन्हा काही दिवसांनी त्या ठिकाणी गोमांस विक्री करताना आढळून येत असतात त्यामुळे आता या ठिकाणी असलेले अवैद्य कत्तलखाने पाडून टाकावेत असे पत्र जिल्हा पोलीस प्रशासनाने महानगरपालिकेला दिले आहे. त्यावर अद्यापही महानगरपालिकेने झेंडीगेट भागामध्ये असलेले कत्तलखाने पाडण्याची कार्यवाही केलेली नाही. १८ डिसेंबर 2024 मध्ये पत्र देऊन तीन महिने उलटून गेले तरी महानगरपालिका अजूनही ॲक्शन मोडवर येत नसल्याचे दिसून आले आहे.पोलीस प्रशासनाने महानगरपालिकेला दिलेल्या अवैध कत्तलखान्यांची माहिती पुढील प्रमाणे.
१) कारो मस्जिद समोर, व्यापारी मोहल्ला झेंडीगट अहिल्यानगर, २) २२ नंबर मस्जिद शेजारी झेंडीगेट अहिल्यानगर, ३) बागवान गल्ली ए.वन बिर्याणी हाउस पाठीमागे झेंडीगेट अहिल्यानगर, ४) सरकारी शौचालयाचे समोर व्यापारी मोहल्ला, झेंडोगेट अहिल्यानगर, ५) कुरेशी मस्जिद जवळ, झेंडीगेट अहिल्यानगर अशा ठिकाणी चालु असलेले अवैध गोवंश जातीच्या जनावरांची कत्तलखान्यावर आपले स्थरावर कायदेशिर उपाययोजना होवून सदरचे कत्तल खाने कायम स्वरूपी बंद होण्यास कायदेशिर कारवाई होण्यास विनंती आहे. अशा आशयाचे पत्र पोलीस प्रशासनाने महानगरपालिकेला दिलेले आहे.