HomeUncategorizedकाँग्रेस पक्षाच्या माजी जिल्हाध्यक्ष सविताताई मोरे यांचा भाजपा मध्ये प्रवेश

काँग्रेस पक्षाच्या माजी जिल्हाध्यक्ष सविताताई मोरे यांचा भाजपा मध्ये प्रवेश

advertisement

अहमदनगर दि .२३ फेब्रुवारी:
अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्ष सविताताई मोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे गेल्या अनेक दिवसांपासून त्या सक्रिय राजकारणापासून बाजूला गेल्या होत्या. भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा नगर मधील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात पार पाडला.

अनेक वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कामाचा ठसा अहमदनगर शहरासह जिल्ह्यात उमटवला होता. काँग्रेसमध्ये असताना काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विविध मेळावे तसेच महिलांसाठी रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना अंतर्गत मदतीचा हात काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्ष म्हणून त्यांनी दिला होता. महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी सरकार दरबारी पाठपुरावा करून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला होता. काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर सामाजिक कार्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन आपले काम सुरू ठेवले होते. राजकारणा व्यतिरिक्त अनेक सामाजिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता वृक्षारोपण,सामुदायिक विवाह, स्वच्छता अभियान, बेटी बचाव बेटी पढाव अशा विविध सामाजिक कार्यात त्यांनी सहभाग नोंदवला होता.

आता पुन्हा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांची राजकीय कारकीर्द आता वेगळ्या पद्धतीने सुरू होणार असून लवकरच प्रदेशचे एखादे पद त्यांना मिळू शकते अशी अपेक्षा त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

या प्रवेश सोहळा कार्यक्रमास धनश्री विखे पाटील जिल्ह्याच्या समन्वयक माधुरी पालवे, अहमदनगर शहर समन्वयक सुधा काबरा, भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्ष प्रिया जानवे, गिता गिल्डा, मालन ढोणे, जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, विनायक देशमुख, सचिन पाररखी, प्रशांत मुथा, पंडित वाघमारे, सविता कोटा यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular