Homeक्राईमविवाहितेला मारहाण करत पैशाची मागणी करणाऱ्या नगरसेवक पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

विवाहितेला मारहाण करत पैशाची मागणी करणाऱ्या नगरसेवक पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

advertisement

अहमदनगर दि.१० जून

सासरी नांदत असलेल्या विवाहितेला मारहाण करत पैशाची मागणी करणाऱ्या नगरसेवक पतीसह तिघांविरुद्ध येथील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरसेवक पती, सासू,सासरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित विवाहित महिलेने फिर्याद दिली आहे.

 २१ मार्च, २०२२ पासून वारंवार पीडित विवाहितेला मारहाण करण्यात आली असल्याचे फिर्याद म्हटले आहे. नगरसेवक पती सासरे सासू यांनी लग्नानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून उपासमारीची वेळ आणली. पैशाची मागणी करून वारंवार मानसिक व शारीरिक छळ केला असल्याचे पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस अंमलदार अमोल आव्हाड करीत आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular