HomeUncategorizedमोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्माला अटक करा, मुस्लिम बांधव...

मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्माला अटक करा, मुस्लिम बांधव आक्रमक शुक्रवारी अहमदनगर जिल्हा बंदचे आवाहन

advertisement

अहमदनगर दि.९ जून
भारतीय जनता पक्षाच्या (BJP) प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यांचे गंभीर परिणाम आखाती देशात पाहायला मिळाले. त्यानंतर भारतात विविध ठिकाणी नुपूर शर्मा यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आली. भारतीय जनता पार्टीने सुद्धा सर्व परिस्थिती पाहता पक्षाच्या प्रवक्त्या नुपुर शर्मा यांची हकालपट्टी केली आहे.

मात्र आता हे प्रकरण शांत होण्यास तयार नसून अनेक ठिकाणी नुपूर शर्मा यांच्या विरोधात आंदोलने सुरू आहेत. अहमदनगर शहरातील सर्व मुस्लिम बांधवांनी आज एकत्र येत एका धार्मिक स्थळांमध्ये बैठक घेऊन नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचा निषेध केला. नुपूर शर्मा वर कायदेशीर कारवाई करायची मागणी केली आहे. नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात आणि तिच्यावर कायदेशीर कारवाई करावी याकरता अहमदनगर जिल्हा बंद आवाहन मुस्लिम बांधवाना तर्फे करण्यात आले आहे.

हा बंद शांततेत पाळावा तसेच यापुढे कोणत्याही राजकीय पक्षांनी धार्मिक तेढ होतील असं वक्तव्य करण्यापासून आपल्या प्रवक्त्यांना समाज  द्यावी आणि भारत देशा सर्व धर्म समभावची शिकवण देणारा देश असल्याने या देशात सुरू असलेल्या जातीय द्वेष भावना पसरणारे राजकारण बंद करावे असे आवाहनही मुस्लिम बांधवांनतर्फे  करण्यात आले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular