अहमदनगर दि.१७ डिसेंबर –
शहर विकासाला गती देण्यासाठी सर्वांगीण विकास कामांची खरी गरज आहे केडगाव उपनगर हे झपाट्याने विकसित होत असून या भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा देणे गरजेचे आहे.नगरसेवक मनोज कोतकर यांनी प्रभाग क्रमांक 17 च्या विकास कामांसाठी पाठपुरावा करून मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. शास्त्रीनगर,समतानगर येथील अनेक वर्षांचा ड्रेनेज लाईनचा प्रश्न प्रलंबित होता. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. नगरसेवक मनोज कोतकर यांनी हा प्रश्न तातडीने मार्गी लागावा यासाठी पाठपुरावा केला होता. त्यामुळे ड्रेनेज लाईनचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. केडगाव उपनगराच्या विकासासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत नियोजनबद्ध व कायमस्वरूपी विकास कामांना प्राधान्यक्रम दिल्यामुळे एक-एक प्रश्न हाती घेऊन कायमस्वरुपी मार्गी लागत आहेत. नगरसेवक मनोज कोतकर यांचे सुरू असलेले विकासाचे व सामाजिक काम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
नगरसेवक मनोज कोतकर यांच्या प्रयत्नातून शास्त्रीनगर,समतानगर येथील बंद पाईप गटार कामाचा शुभारंभ आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी उपमहापौर गणेश भोसले, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे,स्थायी समितीचे मा. सभापती अविनाश घुले,नंदू व्हावळ,अजित कोतकर, सोनू घेमुड, विशाल भिंगारदिवे, अजय गायकवाड, अण्णा शिंदे, शाम कोतकर, भैया शिरसाठ, सुनील रोकडे, भरत मतकर, ओंकार कोतकर, बंटी विरकर, विश्वास तिजोरे, विकास साळवे, सोमा कोतकर,शुभम गायकवाड, सोनू नरसाळे, बाळू नागरगोजे, विनोद गायकवाड, शांताराम शिंदे, अवि लाकूडजोडे, मंगल नागरगोजे, मनीषा चव्हाण, जिजा नरसाळे, सीमा शिरसाठ, प्रियंका घरवाधवे, सारिका सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
नगरसेवक मनोज कोतकर म्हणाले की, प्रभाग क्रमांक १७ हा नव्याने विकसित होणारा भाग आहे. दिवसेंदिवस नागरी वसाहती वाढत आहेत त्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आ.संग्राम जगताप व महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे विकास कामांसाठी मोठा निधी उपलब्ध झाला आहे. टप्पे टप्प्याने प्रभागातील विकास कामे मार्गी लावली जातील. शास्त्रीनगर,समता नगर मधील ड्रेनेज लाईन चा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता.त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाला होता. आता बंद पाईप गटार योजनेचे काम सुरू झाले असून आता हे काम लवकरच मार्गी लागेल असे ते म्हणाले.