Homeशहरएमबीबीएस शिक्षणासाठी मानव पवार रशियाला होणार रवाना. मनपा कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार...

एमबीबीएस शिक्षणासाठी मानव पवार रशियाला होणार रवाना. मनपा कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार संपन्न. मनपा कर्मचाऱ्यांचे विद्यार्थी शिक्षण क्षेत्रात आघाडीवर – विजय कोतकर

advertisement

अहमदनगर दि.१७ डिसेंबर –
केडगाव येथील मनपा कर्मचारी प्रमिलाताई पवार यांचे चिरंजीव मानव सर्जेराव पवार हा एमबीबीएस शिक्षणासाठी रशियाला रवाना होणार आहे. मनपा कर्मचाऱ्यांचे विद्यार्थीही आता विविध शिक्षण क्षेत्रामध्ये अभ्यासाच्या जोरावर आघाडीवर आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शिक्षणाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांना करिअर करण्याच्या विविध संधी उपलब्ध झाले आहेत. ध्येय बाळगून मेहनतीच्या जोरावर यश संपादन करता येते मनपा कर्मचारी आपली नोकरी करून मुलांच्या शिक्षणाचे स्वप्न बाळगत असतात ते पूर्ण करण्याचे काम मुलाचे असते. मानव पवार व मानसी पवार यांनी अभ्यासाच्या जोरावर वैद्यकीय क्षेत्राचे शिक्षण घेत आहेत ही मनपा कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची बाब आहे असे प्रतिपादन विजय कोतकर यांनी  केले.
मानव पवार हा विद्यार्थी एमबीबीएस शिक्षणासाठी रशियाला रवाना होणार आहे यासाठी मनपा कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करताना विजय कोतकर, बाबासाहेब जाधव, प्रमिलाताई पवार, सर्जेराव पवार, सतीश कांबळे, विकास धिवर, झाजू शिंदे, बाळू शिंदे, बाबा अरुण, विजय गायकवाड, मंदा कांबळे, उषा पाचरणे, वैजंता हुलगे,जनाबाई कांबळे, मिराबाई साठे, मंगेश शिंदे आदी उपस्थित होते.
मानव पवार म्हणाले की, आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिक्षणामध्ये अभ्यासाच्या जोरावर यश संपादन करता आले. एमबीबीएस चे शिक्षण पूर्ण करण्यासाठी रशियाला रवाना होणार आहे मनपा कर्मचाऱ्यांच्या वतीने जो माझा सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. माझ्या पाठीवर एक शाब्बासकीची थांब दिली आहे त्यामुळे पुढील ध्येय गाठण्यासाठी मदत होणार आहे असे ते म्हणाले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular