Home Uncategorized आयुष्यात कितीही प्रतिकूल डोंगर आले तरी महिला ते लीलया पार करत कर्तृत्वाचे...

आयुष्यात कितीही प्रतिकूल डोंगर आले तरी महिला ते लीलया पार करत कर्तृत्वाचे हिमालय उभे करतात : न्या.भाग्यश्री पाटील जिल्हा न्यायालायात महिला वकिलांचा हळदीकुंकू समारंभ उत्साहात साजरा

अहमदनगर दि.२० फेब्रुवारी– महिलांचे प्रश्न, त्यांच्या व्यथा हा न संपणारा प्रवास असला तरी कितीही प्रतिकूल डोंगर आयुष्यात आले तरी महिला ते लीलया पार करत कर्तृत्वाचे हिमालय उभे करत आहेत. आयुष्य खूप सुंदर आहे. ते जगताना आपला दृष्टीकोन कायम सकारात्मक ठेवा. महिला वकील आज आपले कर्त्यव्य बजावत विविध क्षेत्रात कर्तृत्वही गाजवत आहेत. महिला वकिलांनी उत्कृष्ट काम करत माझ्या मनात घर केले आहे, जिल्हा न्यायालयात अनुराधा येवले या बारा वर्षापासून हळदीकुंकु कार्यक्रमाची परंपरा जपत चांगला उपक्रम राबवत आहेत, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या.भाग्यश्री पाटील यांनी केले.

रथसप्तमी निमित्त जिल्हा न्यायालयात महिला वकिलांसाठी झालेल्या हळदीकुंकू समारंभात न्या.भाग्यश्री पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमच्या आयोजिका अॅड.अनुराधा येवले यांनी हळदीकुंकू निमित्त उपयुक्त वस्तूंचे वाण देवून न्या.पाटील यांचा सन्मान केला. यावेळी अॅड.स्वाती वाघ, स्वाती नगरकर, निर्मला चौधरी, सुजाता पंडित, जया पाटोळे, सुजाता पंडित, कुंदा दांगट आदि व्यासपीठावर उपस्थित होत्या. यावेळी विधी अधिरक्षक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल रूपाली पठारे, रत्ना दळवी यांचा सत्कार करण्यात आला. सरकारी वकील झाल्याबद्दल सुचिता बाबर व मनीषा डुबे, अबोली कुलकर्णी यांचा, तसेच आकाशवाणीसाठी निवड झाल्याबद्दल पल्लवी बारटक्के, सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल जमीन शेख, पास्को कायद्यांतर्गत खटल्यांसाठी सरकारी वकील म्हणून निवड झाल्याबद्दल मनीषा केळगेंद्रे व शिल्पा शेळके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितीत साधारण दिडशे महिला वकिलांना वाण देण्यात आले.

प्रास्ताविकात अॅड.अनुराधा येवले म्हणाल्या, गेल्या १२ वर्षांपासून जिल्हा न्यायालयात महिला वकिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करत आहे. त्याचबरोबर जिजामाता, सावित्रीबाई फुले या कर्तृत्ववान स्त्रियांची जयंतीही साजरी करत आहोत. यामाध्यमातून वकील व न्यायाधीशांमध्ये सुसंवाद वाढत आहे. नवोदित महिला वकिलांनाही या कार्यक्रमामुळे प्रोत्साहन मिळत आहे. न्या.भाग्यश्री पाटील या कायम महिला वकिलांना सहकार्य व मार्गदर्शन करत आहेत.

यावेळी महिला वकील कुंदा दांगट, गिरीजा गांधी, अनिता पाटील, रिजवान शेख, नीरु काकडे, अरुणा राशिनकर, लता गांधी, ज्योत्स्ना ससाणे, स्नेहा लोखंडे, शर्मिला गायकवाड, पल्लवी होनराव, करुणा शिंदे, मीना भालेकर, राजुल देसरडा, ज्योती हिमणे, दिपाली झांबरे, मनीषा पंडूरे, आरती गायकवाड, मनीषा खरात, सुरेखा मोकाशे, अनुजा काटे, पल्लवी पाटील, श्वेता माळवदे, किरण जाधव, सविता साठे, रुबीन शेख व मुबीन शेख, प्रिया खेडकर, ज्योती डुबे, मीनाक्षी शुक्रे, सुविद्या तांबोळी, बेबी बोर्डे आदी महिला वकील उपस्थित होत्या.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version