अहिल्यानगर दिनांक १५ जून
रविवारी दुपारच्या सुमारास नगर शहरातील झेंडीगेट येथील बाबा बंगाली परीसरात एका घरामध्ये गोवंशिय जनावरांच्या मांसाची विक्री केली जात आहे. अशी माहिती मिळाल्यावरुन कोतवाली पोलीस ठाण्याच्या पोलिस हेड कॉन्स्टेबल रोहिनी दरंदले यांनी गुन्हे शोधपथकासह सदर ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी गोमांस विक्री सुरू असल्याचे दिसून आले. सरफराज कदीर कुरेशी हा त्या ठिकाणी गोमांस विक्री करत होता.
सरफराज कदीर कुरेशी घराची इ ाडती घेतली असता सदर ठिकाणी १०,०००/-रु किंमतीचे लहान मोठे आकाराचे गोवंशीय जनावरांचे मांसाचे तुकडे सुमारे ५० किलो वजनाचे गोमांस, एक लॉखंडी सत्तुर व एक वजन काटा असा एकुन १०,२००/- रु किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन त्याचे विरुध्द कोतवाली पोस्टे भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २७१ सह महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम सन १९९५ चे सुधारित सन २०१५ चे कलम ५ (क) ९ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोनि/ प्रताप दराडे मपोहेकॉ दरंदले, पोकों/ दिपक रोहकले, पोकों/ तानाजी पवार, पोकों / दत्तात्रय कोतकर, पोकों/ शिरीष तरटे पोकों/ सुरज कदम, पोकॉ, सचिन लोळगे, पोकॉ/ राम हंडाळ, पोकॉ/गावडे, पोकों/ कव्हळे यांच्या पथकाने केली आहे.