अहिल्यानगर दिनांक 27 ऑक्टोबर
अहिल्या महानगरपालिकेच्या फेसबुक अकाउंट वर काही तासापूर्वी एक पोस्ट झळकली होती माझी वसुंधरा अंतर्गत नगर शहरात फटाके बंदी आपले अहिल्यानगर प्रदूषण मुक्त अहिल्यानगर आपले अहिल्यानगर हरित बनवूया अशा आशयाची पोस्ट झळकली मात्र त्या पोस्ट खाली अनेक जणांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्याने काही मिनिटातच ही पोस्ट डिलीट करण्यात आली याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुमित वर्मा यांनी या पोस्टवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना लिहिले की..आयुक्त साहेब पर्यावरणाचा विषय फक्त हिंदूंच्या सणांच्या वेळी दिसतो का ? इतरांच्या वेळी प्राण्यांच्या रक्ताचे पाट वाहतात तेव्हा प्रदुषण आणि पर्यावरणाचा विषय कुणी घेत नाही,जिल्हाधीकारी जुन्या कार्यलय परिसरात राजरोसपणे रक्त वाहत असतं तेव्हा कधी आवाहन करण्यात आलं नाही. एका दिवसा साठी कोट्यवधी प्राणी मारले जातात तेव्हा आवाहन नाही झालं की प्रतिकात्मक कापा म्हणून.. हिंदू सहिष्णू आहे म्हणून लगेच आपण असं आव्हान करता का अशी पोस्ट लिहिल्यानंतर काही मिनिटातच प्रदूषण मुक्तीची आणि फटाके बंदीची पोस्ट डिलीट करण्यात आली.
एकीकडे अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने फटाके विक्रीला परवानगी देण्यात येते फाटके विक्रेत्यांकडून शुल्क आकारून त्यांना फटाके विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येते मग एकीकडे या सर्व सोपस्कार करत असताना फक्त दाखवण्यासाठीच हिंदूंचे सण आल्यानंतर यांच्यामधील पर्यावरणवादी जागा होतो का असा सवालही सुमित वर्मा यांनी केला आहे.
महानगरपालिकेचा दुपट्टपीणा यामुळे समोर आला असून एकीकडे प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन नागरिकांना करत असताना दुसरीकडे फाटके विक्रेत्यांना परवानगी देण्याचे कामही महानगरपालिका प्रशासन करत आहे. त्यामुळे जर खरंच प्रदूषण मुक्त दिवाळी करण्यासाठी महानगरपालिकेला हातभार लावायचा असेल तर सर्व फटाके विक्री करणाऱ्या दुकानदारांचे परवाने रद्द करून फटाके विक्रीला बंदी करावी तरच प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी होऊ शकते.