Homeजिल्हामहिला आयोग फक्त नेत्यांच्या मुलीवर टीका झाल्यावरच दखल घेणार का ?...

महिला आयोग फक्त नेत्यांच्या मुलीवर टीका झाल्यावरच दखल घेणार का ? अंगणवाडी सेविकेचा निर्घृणपणे अत्याचार करून खून केला त्याची दखल महिला आयोग घेणार का नाही.. नेत्यांची मुली लाडक्या बहिणी मग सर्वसामान्यांची मुलगी दोडकी बहिण का? महिला आयोगाच्या कामकाजावर सवाल

advertisement

अहिल्यानगर दिनांक 27 ऑक्टोबर

अहिल्या नगर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात दोन दोन भयंकर घटना घडल्या एक अहिल्यानगरच्या उत्तर भागात तर दुसरी अहिल्यानगरच्या दक्षिण भागात मात्र दोन्ही घटनेत फरक एकच होता एका घटनेत सर्वसामान्य घरातील महिलेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला तर दुसरीकडे एका नेत्याच्या मुलीवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यात आली. दोन्ही घटना निषेधार्य आहेत कुणीही या घटनेचे समर्थन करू शकत नाही. मात्र एकीकडे सर्वसामान्य महिलेचा अत्याचार करून खून केला तरीही नेते लक्ष द्यायला तयार नाही तर दुसरीकडे एका नेत्याच्या मुलीवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली तेथे सर्व नेते एकत्र होऊन ठिय्या आंदोलन देत बसले होते याची दखल राज्यातील सर्व राजकीय नेत्यांनी घेतली त्याचबरोबर राज्य महिला आयोगाने याची दखल घेऊन ताबडतोब याबद्दल प्रशासनाला पत्र पाठवून कारवाई करण्याचे आदेश दिले मात्र राज्य महिला आयोगाचा प्रमुख असणाऱ्या रूपाली चाकणकर यांना अहिल्यानगर मधील चिचोंडी पाटील या ठिकाणी एका अंगणवाडी सेविकेवर झालेला अत्याचार आणि त्यानंतर तिचा झालेला निर्घृण खून याबाबत बिलकुल कल्पना नव्हती यावरूनच लक्षात येते की नेत्यांच्या मुली ह्या महिला आयोगाच्या लाडक्या मुली आहेत आणि सर्वसामान्य घरातील मुलगी ही महिला आयोगाची दोडकी बहीण आहे का? असा सवाल आता उपस्थित होतेय.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्याबरोबर फोनवर चर्चा करून महायुतीला अडचणीत येतील असे वक्तव्य करू नका असे सुनावल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. याच अहिल्यानगर जिल्ह्यात एका अंगणवाडी सेविकावर अत्याचार करून तिचा निर्घृण खून झाला याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माहीत नसावे ही एक मोठी खेदाची बाब आहे. त्यांनी जर याबाबत एखादा फोन करून पोलीस प्रशासनाला अथवा जिल्हा अधिकाऱ्यांना त्या महिलेच्या कुटुंबीयांची मदत करण्यास सांगितले असते तर यापेक्षा जास्त लाडक्या बहिणीला कोणती अपेक्षा असणार मात्र तसे झाले नाही ही खेदाची बाब आहे.

ज्या मुलीवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली ती एका राजकीय नेत्याची मुलगी असल्याने त्या ठिकाणी सर्व राजकीय नेत्यांनी ताबडतोब हजेरी लावून या घटनेचा निषेध केला ती घटनाही तशी निषेधार्य होती. त्याचबरोबर त्यापेक्षा जास्त गंभीर म्हणजे एका सर्वसामान्य घरातील महिलेवर अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून केला त्या ठिकाणी राजकीय नेत्यांना भेट देण्यासाठी जावेशे वाटले नाही का असा सवाल आता समोर येत आहे. जर सर्वसामान्यांच्या घरातील मुली लाडक्या नसतील तर मग राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणी म्हणून जाहिरात करणे बंद करावी अशी चर्चा सध्या चिचोंडी पाटील परिसरात सुरू आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या चिचोंडी पाटील या घटनेबाबत अनभिज्ञ कशा असू शकतात राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष असताना एवढी मोठी घटना घडूनही हे त्यांना माहीत नसणे मोठे अपयश आहे. महिला आयोग महिलांसाठीच आहे मग त्यामध्ये गोरगरीब उच नीच कोणताही भेदभाव होता कामा नये मात्र अहिल्यानगर मधील एकाच दिवशी घडलेल्या दोन घटनांमध्ये महिला आयोगाने कामात किती भेदभाव केला हे समोर आले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular