अहिल्यानगर दिनांक ९ जून:
वाडिया पार्क मैदानावर अखंड गवळी समाज व आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित महाकाय चषक क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली, यावेळी स्व. माजी आमदार अरुणकाका जगताप यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या स्पर्धेचे विजेतेपद शिवशंकर वारियर्स संघाने पटकावले तर उपविजेतेपद स्वामी समर्थ स्ट्राईकर्स संघाला मिळाले, या दोन्ही संघांमधील सामना अतिशय चुरशीचा झाला, तर तृतीय पारितोषिक सम्राट किंग इलेव्हन व उत्तेजनार्थ पारितोषिक मुंजोबा वॉरियर्स संघाने पटकविले. तसेच या स्पर्धेतील मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर व बेस्ट बॅट्समन राहुल नागापुरे या खेळाडूला पारितोषिक देण्यात आले असल्याची माहिती माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी दिली.
अखंड गवळी समाज आयोजित महाकाय चषक क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण गुणे आयुर्वेदिक कॉलेजचे अध्यक्ष सचिन जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संतोष गेनाप्पा, दत्तात्रय भागानगरे, दत्ता खैरे, निलेश निस्ताने, ऋषिकेश गोंधळे, रोहित टोकेफळकर, बाली बांगरे, अक्षय नामदे, चंद्रकांत औशीकर, निलेश खताडे, सुनील लालबेंद्रे, किशोर नामदे, गौरव हरबा, सागर चवंडके, भगवान कुरधने आदी उपस्थित होते
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये टीव्ही, मोबाईल या साधनांमुळे युवा पिढी मैदानी खेळापासून लांब चालली आहे, विद्यार्थ्याला शालेय शिक्षणाबरोबरच आपल्या आवडीच्या खेळाचे धडे देणे गरजेचे आहे, आता विविध क्रीडा क्षेत्रामध्ये देखील करिअर करण्याच्या विविध संधी उपलब्ध आहे, खेळामुळे मनुष्याचे आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यास मदत होत असते, अखंड गवळी समाजाने एकत्रित येऊन एकतेचे दर्शन घडविण्याचे काम केले असल्याचे मत आयुर्वेदिक कॉलेजचे अध्यक्ष सचिन जगताप यांनी व्यक्त केले.
गवळी समाजातील युवकांनी एकत्रित येऊन वाडिया पार्क मैदानावर महाकाय चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून सांघिकतेचे दर्शन घडवले आहे या माध्यमातून युवक आपल्या विचारांची देवाणघेवाण करत असतात क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून चांगले विचार निर्माण होत असतात क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून युवक घडला जात असल्याचे मत माजी नगरसेवक संतोष गेनाप्पा यांनी व्यक्त केले.