अहिल्यानगर दिनांक 10 जुलै
नगर शहरातील एका सराफ व्यावसायिकाला व्याजाचे पैसे देत नाही म्हणून व्यापाऱ्यास आणि त्याच्या कुटुंबीयास मारहाण करण्याचा प्रकार घडला असून. याप्रकरणी हिमेश पोरवाल यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात कविता पराळे ,सोहन सुरेश सातपुते,रमांकात पराळे, माहेश्वरी पराळे, प्रणव रमाकांत पराळे, ऋषी रमाकांत पराळे, व त्यांचे सोबत बाऊन्सर सारखे दिसणारे 4 ते 5 अनोळखी लोक यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत थोडक्यात हकीकत अशी की हिमेश पोरवाल यांचा वडिलोपार्जित सोने चांदी विक्रीचा व्यावसाय आहे.हा व्यवसाय त्यांचे वडील 2008 साला पासून ते 2020 पर्यंत पाहत होते. त्यावेळी त्यांच्या दुकानचे ग्राहक म्हणून कविता पराळे या नेहमी सोने खरेदी करण्यासाठी येत होत्या काही पैसे देऊन व काही पैसे उधारीवर ठेवून सोने घेऊन जात होत्या जुन्या गिऱ्हाईक असल्यामुळे आणि विश्वास असल्यामुळे पैसे कधी रोख तर कधी काही दिवसासाठी पैसे उधार ठेवीत असत थोड्याच दिवसामध्ये उधारीचे पैसे आणुन देत असत. असा व्यवहार सुरू असताना हिमेश पोरवाल आणि त्यांचे वडील यांची मिळून 2008 ते 2020 पर्यंत उधारीचे अंदाजे 1 कोटी 50 लाख रुपये झाले होते. 2020 मध्ये हितेश पोरवाल यांच्या वडिलांचे निधन झाले. आणि कोरोना नंतर हितेश पोरवाल यांच्याकडे व्यवसायमध्ये लावण्यासाठी भांडवल कमी पडल्याने व्यवसाय ठप्प झाला होता. त्यावेळी कविता कराळे यांना त्यांच्याकडे असलेल्या उधारीचे पैसे वारंवार मागूनही त्या पैसे देत नव्हत्या 2024 मध्ये कविता परळी या दुकानात आल्या व त्यांनी सांगितले की माझ्याकडे पैसे नाहीत मात्र मी तुम्हाला व्यवसायासाठी व्याजावर पैसे मिळुन देऊ शकते हितेश पोरवाल यांनाही पैशाची गरज असल्याने त्यांनी वार्षिक 15% दराने व्याजावर पैसे घेतले. त्या पोटी कविता रमाकांत पराळे व सोहन सुरेश सातपुते यांनी माझ्या कडुन 10 कोरे चेक घेतले आणि एका वकिलाकडे नोटरी केल्यानंतर 6/6/2024 रोजी 16 लाख रुपये सोहन सुरेश सातपुते याने पोरवाल यांना दिले. व राहीलेले पैसे हे थोड्याच दिवसामध्ये देतो असे दोघांनी आश्वासन दिले व व्याजाचे पैसे हे दर महिण्याचे 20 तारखेला 20 हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र त्यानंतर काही दिवसांनी 19 लाख रुपये पोरवाल यांना देण्यात आले त्यानंतर पुन्हा नऊ लाख रुपये पोरवाल यांच्याकडून कविता यांनी मागून घेतले. मात्र पूर्ण व्यवहार झालास नसल्याने अखेर पोरवाल यांनी आपल्या दुकानातील काही सोने एका खाजगी फायनान्स मध्ये ठेवून त्यावर कर्ज काढून आपली गरज भागवून घेतली होती.तो पर्यंत सुरेश सातपुते यांचे कडुन घेतलेल्या 26 लाख रुपयावर फेब्रुवारी 2025 पर्यंत 20 हजार रुपये प्रत्येक महिण्याचे 20 तारखेला व्याज रोख स्वरुपात पोरवाल देत होते.
मात्र 25 फेब्रुवारी 2025 रोजी कविता यांनी पोरवाल यांच्या दुकानात येऊन आता पुढच्या महिन्यापासून तुला एक कोटी रुपयावर 15% व्याज द्यावे लागणार असून त्याप्रमाणे व्याज दे अशी दमबाजी करण्यात आली.
मात्र हा व्यवहार नसल्याने जो व्यवहार आहे त्याचे पैसे मी देण्यास बाहेर आहे मात्र जो व्यवहार ठरलेला नाही त्या व्यवहाराचे पोरवाल यांनी पैसे देण्यास नकार दिला त्यानंतर कविता परळी यांनी पोरवाल यांच्याघरच्यांना दमबाजी करत मला माझे पैसे द्या असे म्हणत शिवीगाळ करुन व्यावसायिक पोरवाल चार चाकी होन्डाई कंपनीची कार बळजबरीने घेऊन गेल्या. त्यानंतर सात जुलै रोजी पुन्हा कविता पराळे,रमाकांत पराळे , माहेश्वरी पराळे, प्रणव पराळे, ऋषी पराळे, व काही बाउन्सर यांनी पोरवाल यांच्या घरात घुसून पोरवाल यांचा मुलगा विहार याच्या डोक्याला बंदूक लावून पंधरा लाख रुपये दे नाहीतर इथेच मारून टाकेल अशी धमकी दिली तसंच पोरवाल यांच्या पत्नीलाही मारहाण करण्यात आली. आणि शिवीगाळ करण्यात आली. याप्रकरणी आता कोतोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास कोतवाली पोलीस स्टेशनच्या सपोनि तेजश्री थोरात या करीत आहेत.