अहमदनगर दि.१४ जुलै
अहमदनगर शहरात तोफखाना पोलिसांनी मोठी कामगिरी केली असून बनावट आधारकार्ड तयार करून त्याद्वारे आयडिया व जिओ कंपनीचे शेकडो सिमकार्ड विक्री केल्या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी सिमकार्ड विक्री करणाऱ्या अमोल अशोक टीळेकर या सिम कार्ड विक्री करणाऱ्यास अटक केली आहे.
शहरातील भिस्तबाग परिसरात असणाऱ्या आरोह नगर येथे अमोल टिळेकर याच्या घरावर छापा घातला असता तेथून बनावट आधारकार्ड वापरून शेकडो सिमकार्ड विशिष्ट लोकांना विक्री करण्यात आल्याचे समोर आल्याने आरोपी अमोल टिळेकर याची अधिक माहिती घेतली असता आरोपीचे प्रत्यक्षात दुकान नसून तो राहत्या घरातून आयडिया व जिओ कंपनीचे सिमकार्ड विक्री करणारा डीलर असल्याचे समोर आले आहे. त्याने विक्री करता आणलेले शेकडो सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत.आरोपी अमोल टिळेकर याने बनावट ग्राहकांची छायाचित्र वापरून,बनावट आधारकार्ड तयार करून अनेक सिमकार्ड वितरीत केले असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
तर दुसऱ्या एका प्रकरणात नगर शहरात बनावट डिग्री बनवणाऱ्या टोळीचा पर्दा फाश झाला असून दहावीपासून ते थेट डॉक्टर इंजिनिअर पासून मोठं मोठ्या डिग्री प्रमाणपत्र अगदी स्वस्तात भेटत असल्याचं समोर आले आहे.ही साखळी दिल्ली पर्यंत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली असून यामुळे अनेक मुन्ना भाई डिग्रीवाले आता पोलीस तपासत समोर येऊ शकते.