अहिल्यानगर दिनांक २४ ऑक्टोबर
बबनराव खोकराळे यांच्या संदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांच्या आदेशान्वये दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी आरोपी असलेल्या डॉक्टरांना अटक करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.गुन्हा दाखल होऊन सात दिवस झाले तरी आरोपी डॉक्टर पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाले आहेत.

या बाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश तुकाराम जाधव यांनी शिष्टमंडळासह पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेतली होती आणि आरोपींना अटक करावी अशी मागणी केली होती या मागणीला आता पाच दिवस उलटून गेले आहेत.
तर तोफखाना पोलीस स्टेशन येथे दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपी १. डॉ. गोपाल बहुरूपी २. डॉ. सुधीर बोरकर 3. डॉ. मुकुंद तांदळे ४. डॉ. असदीप झावरे ४. डॉ. सचिन पांडुळे सह डॉ. विखे पाटील हॉस्पिटल, विळद घाटने संबंधित डॉक्टर, या आरोपींपैक बहुरूपी आणि बोरकर यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेऊन तात्पुरता अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.त्यावर आता २८ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.
आरोपींना अटक होत नसल्याने आता फिर्यादी अशोक खोकराळे हे येत्या सोमवार पासून अनोखे आंदोलन करणार आहेत जो पर्यंत आरोपी डॉक्टर पोलिस पकडत नाही तो पर्यंत तोंडावर काळा कपडा बांधून हातात बेड्या घालून आंदोलनाला बसणार असल्याचे अशोक खोकराळे यांनी सांगितलय.
आता या प्रकरणात अनेक पेशंटचे नातेवाईक सहभागी होणार असल्याची माहिती अशोक खोकराळे यांनी दिली आहे. कोविड काळात या डॉक्टरांकडे उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना जे अनुभव आले आहेत ते पेशंट आणि नातेवाईक आता खोकराळे यांच्या संपर्कात आले असून अनेकांना खोकराळे यांच्या प्रमाणे अनुभव आलेले आहे ते सुधा या आंदोलनात सहभागी होणार आहेत.