अहिल्यानगर दिनांक 30 ऑक्टोबर
अहिल्यानगर शहरातील पाच डॉक्टरांवर उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाच्या स्पष्ट निर्देशानुसार तोफखाना पोलीस ठाण्यात कारोना असल्याचा बनाव करुन व त्याबाबत खोटे कागदपत्र तयार करुन, करोना संसर्गित रुग्णासोबत मर्जी विरुध्द अॅडमीट करुन त्याच कक्षात रुग्णाचे जिवतावर होणाऱ्या जिवघेण्या परिणामांची कल्पना असतांनी ही अतीतिव्र जास्तीचा ढोस देऊन जिवीतास धोका निर्माण होईल असे कृत्य करुन रुग्णाच्या मृत्युस कारणीभूत होणे, अवाजवी अवास्तव बिल रक्कम आकारणे, शरीराचे अवयवाची तस्करी व पुरावे नष्ठ करण्याच्या उद्देशाने प्रेताची परस्पर विल्हेवाट लावणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

18 ऑक्टोबर रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र 12 दिवस उलटूनही आरोपी असलेल्या एकही डॉक्टरला पोलिसांनी अटक केलेली नाही. त्यामुळे आता फिर्यादी अशोक खोकराळे यांनी स्वतःच्या हातात दोरखंडाच्च्या बेड्या बांधून यातील डॉक्टर आरोपींना अटक होई पर्यंत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला असून उद्या सकाळी अकरा वाजेपासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर अशोक खोकराळे हे उपोषणास बसणार आहेत.
सदरचा गुन्हा हा सदोष मनुष्य वद्याचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून देखील यातील आरोपी डॉक्टरांना अद्याप तपासयंत्रणे कडून अटक झालेली नाही. तसेच मी स्वतः फिर्यादी या नात्याने आपणाकडे वेळोवेळी तोंडी चौकशी करून देखील सदर प्रकरणावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली दिसून येत नाही. तसेच तपासामध्ये होत असलेल्या हलगर्जीपणाबाबत व एकतर्फी तपासाबाबत मी आपणाकडे उच्च न्यायालय मुंबई खंडपिठ औरंगाबाद कडे दि. २९/१०/२०२५ रोजी लेखी तक्रार केलेली होती त्यामुळे आता कुठलाही पर्याय शिल्लक न राहिल्यामुळे मी माझ्या संविधानीक पर्यायाचा अवलंब करून हातात बेड्या घालून उपोषण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे नियोजन अशोक खोकराळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहे.