अहमदनगर दि.२६ ऑगस्ट
फेसबुक आणि सोशल मीडिया हॅकिंग चे प्रकार आता सर्वत्र होत असून या हॅकिंगला आणि फेसबुक क्लोनिंगला सर्वसामान्य माणसांसह मोठमोठे अधिकारीही बळी पडत आहेत.अहमदनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या अधिकाऱ्यांचे फेसबुक आणि व्हाट्सअप हॅक होण्याचे प्रकार घडत असून त्या मध्ये महानगरपालिकेचे आयुक्त तसेच पोलीस प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकारी यांचे फेसबुक अकाउंट हॅक करून त्यावरून पैसे मागण्याची प्रकार उघडकीस आले होते. मात्र आता या सायबर हॅकरने थेट अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे फेसबुक अकाउंट बनावट बनवण्यात आल्याने हा एक चर्चेचा विषय झाला आहे.
सर्वसामान्य लोकांचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्यानंतर त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आता थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फेसबुक अकाउंट हॅक होणे सुरू झाल्याने सायबर क्राईम मधील हे अज्ञात चोरटे कोणालाच सोडत नाही हेच या गोष्टीवरून समोर आले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे बनावट अकाउंट उघडण्यात आल्यानंतर याची माहिती मिळताच त्यांनी याबाबत त्यांच्या मूळ फेसबुक अकाउंट वरून या प्रकाराची माहिती दिली आहे तसेच यावरून आलेले कोणतेही संदेश गृहीत धरू नये असेही आवाहन त्यांनी केले आहे.